मुंबई, 24 मे : जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. लाखो लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या या व्हायरसवर अद्यापही ठोस लस सापडलेली नाही. प्रत्येक देशाकडून या व्हायरसवर औषध आणि लस तयार करण्याचं काम सुरू आहे. ही लस कधी येणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार नवीन कोरोना व्हायरस सार्स-सीओवी-2चे विषाणू श्वसनातून शरीरात प्रवेश करतात त्यामुळे श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यासोबतच इतरही लक्षण या रुग्णांमध्ये आढळून आली आहेत. इटलीमधील पिसा युनिव्हर्सिटीच्या रुग्णालयातील एका अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोनाचं संक्रमित व्यक्तीला थायरॉईड आजार झाल्याची ही पहिलीच केस आहे. 21 फेब्रुवारीला रुग्णालयात 18 वर्षांच्या तरुणीची तपासणी करण्यात आली होती. या तरुणीच्या वडिलांना कोरोना झाला होता. वडिलांचा संसर्ग या तरुणीला झाल्यानं तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. या उपचारांनंतर 14 मार्च रोजी महिलेची तपासणी केली गेली तेव्हा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि डिस्चार्ज देण्यात आला. हे वाचा- कोरोना संशयित वयोवृद्ध सरपटत चौथ्या मजल्यावरुन आले, पण तोपर्यंत… तीन दिवसांनंतर पुन्हा या महिलेला ताप, थकवा आणि घशात वेदना होऊ लागल्या. जेव्हा डॉक्टरांनी त्या महिलेची तपासणी केली त्यावेळी ब्लडप्रेशरही खूप वाढल्याचं त्यांच्या लक्षात आलं. महिलेच्या सर्व चाचण्या पुन्हा करण्यात आल्या त्यावेळी या महिलेला थायरॉइड झाल्याचं निदान समोर आलं. याआधी एक महिन्यापूर्वी केलेल्या चाचण्यांमध्ये महिलेला हा आजार नव्हता. कोरोनाच्या संक्रमणानंतर महिलेला सबअक्यूट थायराइडिटिस आजार झाल्याचं या रिेपोर्टनंतर समोर आलं. या महिलेचे रिपोर्ट पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. आठवड्याभराचा उपचारानंतर महिलेली प्रकृती सुधारली. कोरोनाचे विषाणू हे शरीरातील एखाद्या भागावर परिणाम करून जातात त्यामुळे बऱ्याचदा अॅनिमिया, ब्रेम स्ट्रोक, किंवा इतर आजारही होण्याचा धोका होऊ शकतो असंही एका अहवालातून काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. हे वाचा- कोरोनाव्हायरसविरोधात कधी येणार औषध? भारतातील तज्ज्ञांनी दिली मोठी माहिती संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.