आपला जीव धोक्यात टाकून 'या' देशात रुग्णांवर उपचार करत आहेत 65 हजार भारतीय डॉक्टर

आपला जीव धोक्यात टाकून 'या' देशात रुग्णांवर उपचार करत आहेत 65 हजार भारतीय डॉक्टर

फक्त मायदेशातच नाही तर परदेशातही भारतीय डॉक्टरांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

  • Share this:

लंडन, 24 मे : कोरोनाचं संकट जगभरात परसत चाललं आहे. यात डॉक्टर, पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांवर उपचार करत आहे. फक्त मायदेशातच नाही तर परदेशातही भारतीय डॉक्टरांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. ब्रिटेनमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता भारतीय डॉक्टर सध्या कोरोना रुग्णांवर उपचार करत आहे. भारतीय डॉक्टरांचा ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या फ्रंटलाइन डॉक्टरांमध्ये समावेश आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधितांवर उपचार करत असताना भारतीय डॉ. मनजीत सिंग यांचा मृत्यू झाला. डॉ मनजीत रॉयल डर्बी हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार करत होते. मनजीत यांच्यासारखेच शेकडो डॉक्टर कोरोना वॉरिअर्स बनून लोकांची सेवा करत आहे.

ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेत एकूण कर्मचाऱ्यांपैकी 43.3 टक्के भारतीय आहेत. एवढेच नाही तर एनएचएसमध्ये एकूण दीड लाख डॉक्टर काम करत आहे. या कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाचा धोका आता दिवसेंदिवस वाढत आहे.

वाचा-कोरोनाचं संक्रमण झालेल्या रुग्णांना थायरॉइडचा धोका, रिसर्चमधून नवा दावा

ब्रिटनमध्ये अल्पसंख्याकांना जास्त धोका

असे सांगितले जात आहे की, ब्रिटनमध्ये ब्लॅक आशिया मायनॉरिटी अॅथिनिक ग्रुपवर कोरोनाचा सगळ्यात जास्त धोका आहे. एनएचएसच्या 1 मार्च ते 21 एप्रिलच्या डेटामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. कोरोना व्हायरसमुळं आतापर्यंत ब्रिटनमध्ये सर्वात जास्त भारतीयांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 492 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. एवढेच नाही तर कोरोनामुळं 203 वैद्यकिय कर्मचाऱ्यांचा ब्रिटनमध्ये मृत्यू झाला आहे. यापैकी 63 टक्के कर्मचारी हे ब्लॅक आशिया मायनॉरिटी अॅथिनिक ग्रुपमधील आहेत. तर, 67 टक्के कर्मचाऱ्यांचा मृत्यू ब्रिटन बाहेर झाला आहे. या आकड्यांमुळे अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशिअन ऑफ इंडियन ऑरिजिनच्या अध्यक्षांनी असे सांगितले की, ब्रिटनच्या एनएचएससाठी 65 हजार भारतीय डॉक्टर काम करतात. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत ज्या 32 डॉक्टरांचा मृत्यू झाला त्यापैकी केवळ 2 गौरवर्णीय आहेत. यावरून भारतीय डॉक्टरांचा जीव जास्त धोक्यात असल्याचे दिसत आहे.

वाचा-कोरोनाविरोधात 130 औषधांचं ट्रायल; 'ही' दोन औषधं प्रभावी, तज्ज्ञांची माहिती

वाचा-देशांतर्गत 25 मेपासून विमानसेवा सुरू पण मुंबईसह महाराष्ट्रात संभ्रम कायम

First published: May 24, 2020, 8:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading