लुधियाना, 24 मे : सोशल मीडियावर ज्याप्रकारे मीम्स, फनी पोस्ट-व्हिडीओ व्हायरल होत असतात, त्याचप्रमाणे काही कौतुकास्पद गोष्टी व्हायरल होतच असतात. सध्या एका मेडिकल शॉपचा फोटो ट्विटरवर खूप व्हायरल झाला आहे. ज्या युजरने हा फोटो पोस्ट केला आहे, त्याच्यानुसार हा मेडिकल शॉपचा फोटो पंजाबमधील लुधियाना शहरातील आहे. तुम्ही म्हणाल या फोटोमध्ये असं काय आहे जो व्हायरल होत आहे. तर तुम्ही नीट निरखून पाहिलं तर या फोटोमध्ये दिसणारी मेडिकल दुकानाची पाटी वेगळीच आहे. या दुकानाच्या साइनबोर्डवर चक्क ‘गुप्ता अँड डॉटर्स’ असं लिहिलं आहे. आपण आजुबाजुला पाहिलं तरी शेकडो साइनबोर्ड असे दिसतील की ज्यावर ‘… अँड सन्स’ असं लिहिलेलं दिसून येतं. मात्र लुधियानामधील या नावाच्या पाटीने नक्कीच सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. (हे वाचा- इन्स्टाग्रामवर करता येणार एका वेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल, वाचा काय करावे लागेल ) डॉ. अमन कश्यप या ट्विटर युजरने हा फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमधून त्यांनी या फोटोचं भरभरून कौतुक केले आहे.
Gupta nd daughters .... 👏🏽👏🏽 Unlike all the shops opened in the name of Sons, a medicine shop in association with “Gupta & Daughters” spotted in Ludhiana.
— Dr Aman kashyap (@DrAmankashyap) May 22, 2020
Be the change you want to see in this world ♥️ pic.twitter.com/rRE2JiYHpK
दरम्यान या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. असे बदल निश्चित स्वरूपात होणं गरजेचं आहे अशा आशयाच्या कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त रिट्विट्स या फोटोला मिळाले असून 6 हजार युजर्सनी या मेडिकल दुकानाचा फोटो लाइक केला आहे.