JOIN US
मराठी बातम्या / देश / वऱ्हाड्यांनो...आता येणार नाही घाम, जोरात नाचा! वरातीसाठी भन्नाट कल्पना

वऱ्हाड्यांनो...आता येणार नाही घाम, जोरात नाचा! वरातीसाठी भन्नाट कल्पना

आता वरातीतही मनमोकळेपणाने नाचता यावं यासाठी एक थंडगार उपाय शोधून काढलाय.

जाहिरात

वऱ्हाडी बेदम नाचले पण कोणावर घामाचा एक थेंबही दिसला नाही.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मेघा उपाध्याय, प्रतिनिधी इंदौर, 15 जून : कडाक्याचा उन्हाळा, त्यात भरजरी कपडे, मेकअपमधून घामाच्या धारा…अरेरे नको नको उन्हाळ्यात लग्नच नको. जरी एसी हॉलमध्ये लग्न लागलं तरी वरातीत धड नाचताही येत नाही. असा विचार तुम्हीही करत असाल, तर जरा थांबा. कारण आता वरातीतही मनमोकळेपणाने नाचता यावं यासाठी एक थंडगार उपाय शोधून काढलाय. मध्यप्रदेशच्या इंदौरमध्ये एक अशी वरात निघाली की, जिची चर्चा सध्या सर्वत्र आहे. या वरातीत तब्बल 40 डिग्री सेल्सियसमध्ये वराती कूल डान्स करताना पाहायला मिळाले. त्याचं झालं असं की, या वऱ्हाडाने कडकडीत उकाड्यावर एक झणझणीत उपाय शोधून काढला. थेट चालते-फिरते कूलरच घेऊन वरात काढली ना राव. एकूण 11 जम्बो कूलर्सची व्यवस्था या लग्नात करण्यात आली होती. त्यामुळे वऱ्हाडी बेदम नाचले पण कोणावर घामाचा एक थेंबही दिसला नाही. https://youtu.be/QCxa437jkrA हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून ज्यांच्या घरात यंदा कर्तव्य आहे, अशी मंडळी त्यांच्याही लग्नात चालते-फिरते कूलर ठेवण्याचा विचार करत आहेत. पर्यायाने कूलरचा खप वाढला आहे. शिवाय या भन्नाट कल्पनेचं सर्वत्र कौतुकही होत आहे. लग्न तर सगळेच करतात पण कधी झाडांचं लग्न ऐकलं का? इथं पार पडला शाही लग्न सोहळा तसेच समारंभांसाठी आता कूलर भाड्याने मिळण्यासही सुरुवात झाली आहे. हे कूलर जनरेटरशी जोडून आणि खाली चाकं लावून वापरले जातात. दरम्यान, इंदौरमध्ये पार पडलेल्या या वरातीत वऱ्हाडी काही वेळासाठी उन्हाळ्याचे दिवस आहेत हे विसरूनच गेले होते. सर्वांनी दिलखुलासपणे डान्स केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या