JOIN US
मराठी बातम्या / देश / 'इलाका मेरा...' गावात वानरांच्या 2 गटांमध्ये असा राडा की गाव झालं गप्प, पुढे काय घडलं? VIDEO

'इलाका मेरा...' गावात वानरांच्या 2 गटांमध्ये असा राडा की गाव झालं गप्प, पुढे काय घडलं? VIDEO

एका ठिकाणी भांडण झाल्यानंतर थोडं दूर गेल्यानंतर एका घरात जाऊन पुन्हा भांडण सुरू झाले.

जाहिरात

(वानरांचा व्हिडीओ व्हायरल)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अभिनव कुमार, प्रतिनिधी दरभंगा, 15 मे : ज्या प्रमाणे एखादा भाई आपल्या एरियामध्ये दादागिरी करतो तसाचा प्रकार वानरांच्या बाबतीत पाहण्यास मिळाला आहे. वानरांच्या दोन गटाने गावात असा धिंगाणा घातला की, लोकांना बाहेर पडता आलं नाही. एका घरात घुसून वानरांच्या 2 गटांनी राडा घातल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना बिहारमधील दरभंगा परिसरात घडली आहे. आपलं वर्चस्व कायम राहावे यासाठी वानरांच्या गटामध्ये मोठा राडा पाहण्यास मिळाला. गावात दोन वानरांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले. बघता बघता तिथं इतर वानरं जमा झाली. काही वानरं हे भांडण सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते, तर काही जण एकमेकांवर धावून जात होते. बघता बघता वानरांचे दोन मोठे गट जमा झाले.

दोन्ही वानरांमध्ये भांडण इतक्या टोकाला पोहोचलं की लोकांना बाहेर निघणे मुश्किल झाले होते. एका ठिकाणी भांडण झाल्यानंतर थोडं दूर गेल्यानंतर एका घरात जाऊन पुन्हा भांडण सुरू झाले. वानरांच्या कळपामध्ये मारामारी सुरू झाली. मोठ्याने आवाज आणि वानरांचं रूप पाहून गावातील लोकांची पुढे येण्यास हिंमत झाली नाही. लोक इतके घाबरले होते की, रस्त्यावर बाहेर येणे कठीण झाले होते. अखेरीस दोन्ही गटातील वानरांचा वाद शमला, त्यानंतर दोन्ही गट तिथून निघून गेले. त्यामुळे लोकांनी एकच सुटकेचा श्वास सोडला. (अस्मानी संकटामुळे पक्षांचं आयुष्यचं बदललं, धक्कादायक माहिती समोर) या जिल्ह्यात वानरांची दहशत बऱ्याच दिवसांपासून आहे. वानरांचा उपद्रव एवढा वाढला आहे की, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे डबे पळवून नेण्याचा प्रकारही घडला आहे. या परिसरता वानरांची इतकी दहशत आहे की, अनेक घरांवरील पाण्याचे पाईप सुद्धा तोडून टाकले आहे. वानरांनी एकीकडे उच्छाद मांडला असल्यामुळे वनविभाग यावर कधी कारवाई करणार, अशी मागणी स्थानिक करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या