महामार्गावरून जाताना अचानक पेट्रोल संपलं किंवा गाडीचं इंधन बंद पडलं तर काळजी नसावी.
नवी दिल्ली, 17 जून : काही किरकोळ खरेदी केल्याच्या किंवा पेट्रोल भरल्याच्या पावत्या आपण लगेचच फाडून फेकून देतो. महामार्गावर टोल भरल्याची पावतीही सहसा कोणी जपून ठेवत नाही. तुम्हीदेखील असंच करत असाल, तर यापुढे पावती फेकण्याआधी त्यावर मिळणाऱ्या ‘या’ सुविधांची माहिती करून घ्या. ‘नवभारत टाइम्स’नं त्याबाबतचं वृत्त दिलं आहे. राष्ट्रीय महामार्गावर गाडी चालवताना टोल भरून मिळणारी पावती बऱ्याचदा गाडीतच कुठेतरी पडलेली असते किंवा फेकून दिली जाते. मात्र ही पावती जपून ठेवल्यास काही फायदे तुम्हाला होऊ शकतात. त्यामुळे तुमचा प्रवास पूर्ण होईपर्यंत ती नक्की जपून ठेवा.
या टोल पावतीवर 1 ते 4 फोन नंबर लिहिलेले असतात. ते हेल्पलाईन, क्रेन सर्व्हिस, अॅम्ब्युलन्स सर्व्हिस, पेट्रोल सर्व्हिस यासाठीचे असतात. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे टोलच्या बदल्यात या सेवा ग्राहकांना मिळतात. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या वेबसाइटवरदेखील हे नंबर मिळू शकतात. Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर, फुलंही उधळली या क्रमांकांवर जेव्हा फोन कराल, तेव्हा लगेचच फोन उचलला जातो. महामार्गावर काही समस्या आल्यास नॅशनल हायवे ऑथॉरिटीचा हेल्पलाइन क्रमांक 1033 किंवा 108 वर संपर्क साधू शकता. ही सेवा 24 तास सुरू असते. महामार्गावरून जाताना अचानक पेट्रोल संपलं किंवा गाडीचं इंधन बंद पडलं तर काळजी नसावी. गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून टोल पावतीवरच्या पेट्रोल क्रमांकावर फोन केल्यास मदत मिळू शकते. तुम्हाला मदत म्हणून 5 किंवा 10 लिटर इंधन देण्यात येतं. अर्थात त्यासाठीचे पैसेही भरावे लागतात. पेट्रोल हेल्पलाइन क्रमांक 8577051000 / 7237999944 हे असतात. महामार्गावर काही वेळेला वैद्यकीय मदत लागू शकते. त्यावेळी टोल पावतीवरील मेडिकल इमर्जन्सी क्रमांकावर फोन करता येऊ शकतो. फोन केल्यावर 10 मिनिटांमध्ये रुग्णवाहिका दाखल होते. ही सुविधा मोफत असते. टोल पावतीवरचे 8577051000 / 7237999911 हे क्रमांक वैद्यकीय मदतीसाठीचे असतात. महामार्गावरील टोल पावतीद्वारे मिळणाऱ्या या सुविधांचा लाभ घेण्यासाठी ती पावती तुम्हीच खरेदी केलेली असावी. तसंच एखाद्या जुन्या पावतीच्या आधारे तुम्ही ही मदत मागू शकत नाही. इंधन संपल्यावर तुम्हाला मोफत इंधन याद्वारे मिळू शकत नाही. तत्काळ मदत म्हणून दिलं जाणारं इंधन केवळ तुमची गाडी पेट्रोल पंपापर्यंत पोहोचेल इतकंच असतं. गाडीचं टायर पंक्चर झाल्यास तुम्ही हेल्पलाइन नंबरवर फोन करून 10 मिनिटांत मदत मिळवू शकता. राष्ट्रीय महामार्गावर अडचण आल्यास टोल पावतीच्या आधारे त्यातून मार्ग काढता येतो. मात्र त्यासाठी प्रवास संपेपर्यंत पावती सांभाळून ठेवणं गरजेचं असतं.