मुंबई : बऱ्याचदा सवय असते की छोट्या कामासाठी किंवा जागेच्या अभावी गाड्या चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या ठिकाणी पार्क केल्या जातात. वारंवार सांगूनही या सूचनांकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम होणं, अडथळा निर्माण होणं अशा घटना समोर आल्या आहेत. जेव्हा समज देऊनही ऐकलं जात नाही हे लक्षात आल्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांमुळे अडचण निर्माण होते. त्यावर आता तोडगा काढण्यात आला असून तुम्ही जर अशी गाडी पार्क करत असाल तर तुम्हालाही याचा फटका बसू शकतो. गडकरींनी यापूर्वीही अनेक कार्यक्रमांत यासंदर्भात विशेष घोषणा केल्या होत्या. त्यांची ही घोषणा ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. जर कोणी रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने वाहन पार्क केलं असेल त्याचा फोटो काढून पाठवला तर त्याला 500 रुपयांचं बक्षीस मिळेल.
चुकीच्या पद्धतीनं गाडी लावणाऱ्याला 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल. हा नियम कुठे आणि कधीपासून लागू होणार याबाबत मात्र अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. हा नियम राबवण्याबाबत सध्या आराखडा तयार केला जात आहे. त्यामुळे तुम्ही चुकीच्या पद्धतीनं वाहन लावण्याआधी 10 वेळा विचार करा नाहीतर चुकून तुमच्यासोबतच हे घडू शकतं.
Viral Video : ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेल्या बस ड्रायव्हरने बसमध्येच सुरु केलं हे कामचुकीच्या पद्धतीने वाहने उभी करण्याच्या सवयीला आळा घालण्यासाठी हा कायदा आणण्याचा उद्देश असल्याचे गडकरी म्हणाले होते. ते म्हणाले होते, ‘मी एक कायदा आणणार आहे - त्यानुसार जो कोणी रस्त्यावर वाहन उभे करेल, त्याच्यावर 1000 रुपये दंड आकारला जाईल. याशिवाय चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनाचे छायाचित्र पाठवणाऱ्याला 500 रुपयांचे बक्षीस दिले जाईल.