JOIN US
मराठी बातम्या / देश / तुरुंगाचं जेवण आता सर्वांना मिळणार; 'इथं' सुरू होतेय खास सुविधा

तुरुंगाचं जेवण आता सर्वांना मिळणार; 'इथं' सुरू होतेय खास सुविधा

खानावळीत केवळ जेवणाचा आस्वाद घेणाऱ्या नागरिकांना कमी किंमतीत जेवण मिळणार नाही, तर यामुळे कैद्यांना त्यांच्या कष्टाचे पैसेही कमवता येतील.

जाहिरात

'हा' प्रयोग यशस्वी झाला, तर पुढे घरबसल्या नागरिकांना जेवण ऑर्डर करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अखंड प्रताप सिंह, प्रतिनिधी कानपूर, 26 जुलै : तुरुंगातलं जेवण बेचव असतं, तिथे पुरेसं जेवण दिलं जात नाही, खूप काम करावं लागतं, असं वेगवेगळ्या लोकांकडून आपण तुरुंग जीवनाबाबत वेगवेगळी माहिती ऐकत असतो. मात्र तिथे नेमकं कसं जेवण मिळतं, तिथलं जीवन कसं असतं, हे तुरुंगात गेल्याशिवाय कळत नाही. तुम्हालाही तुरुंगातील जेवणाबाबत फार प्रश्न असतील, तर ते जेवण आता तुम्ही स्वतः पोटभर जेवू शकता. उत्तर प्रदेशातील कानपूरचे जिल्हाधिकारी विशाख यांच्या निर्णयानुसार तिथे कैद्यांची खानावळ सुरू होणार आहे. जिल्हा कारागृहाच्या गेटवर ही खानावळ सुरू करण्यात येईल. या खानावळीत केवळ जेवणाचा आस्वाद घेणाऱ्या नागरिकांना कमी किंमतीत जेवण मिळणार नाही, तर यामुळे कैद्यांना त्यांच्या कष्टाचे पैसेही कमवता येतील. शिवाय हा प्रयोग यशस्वी झाला, तर पुढे घरबसल्या नागरिकांना जेवण ऑर्डर करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल.

जिल्हा कारागृहाचे अधीक्षक डॉ. बी. पी. पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कारागृहाच्या स्वयंपाकघरात काम करणारे कैदी इतर कैद्यांसाठी जेवण बनवतात. सचिन फक्त एक मोहरा? सीमाचा उद्देश वेगळाच? वाचा महत्त्वाची अपडेट महत्त्वाचं म्हणजे, खाणावळीमुळे कैद्यांना केवळ काम मिळणार नाही, तर शिकायलाही मिळेल. सर्वसामान्य व्यक्तींसाठी तुरुंगाबाहेर एक काउंटर सुरू करण्यात येईल, त्यातून ते जेवण ऑर्डर करू शकतील. हा काउंटर या महिन्यातच तयार होणार असल्याचं कळतं आहे. तर, पुढील महिन्यापासून खानावळ सुरू होईल. या खानावळीतील पदार्थांची किंमत अद्याप ठरलेली नाही, मात्र ती सर्वांना परवडण्यायोग्य असेल, असं कळतं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या