लोकांच्या संपर्कात राहण्यासाठीही फोन आवश्यक आहे. पण या फोनचा जास्त वापर हानीकारक ठरू शकतो.
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : आपण सर्वजण मोबाईल फोन वापरतो. मोबाईलशिवाय आपली बरीचशी कामं होत नाहीत. त्याशिवाय सोशल सर्फिंग आणि लोकांच्या संपर्कात राहण्यासाठीही फोन आवश्यक आहे. पण या फोनचा जास्त वापर हानीकारक ठरू शकतो. टेक्नॉलॉजी आणि स्मार्ट गॅजेट्स ही एखाद्या व्यसनापेक्षा कमी नाहीत. या व्यसनाचा तुमच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. हैदराबादमधील एका महिलेलाही अशीच रात्री फोन वापरायची सवय होती. रोज रात्री सोशल मीडिया स्क्रोल करण्याची तिची सवय महागात पडली असून, तिने दृष्टी गमावली आहे. हैदराबादमधील न्यूरॉलॉजिस्ट असलेले डॉ. सुधीर यांनी ट्विटरवर 30 वर्षीय महिलेने रात्रीच्या अंधारात फोन वापरून दृष्टी कशी खराब केली, याबद्दल सांगितलं. काय होती लक्षणं? या ट्विटर थ्रेडमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की, त्यांची मंजू नावाची एक पेशंट त्यांच्याकडे काही लक्षणं घेऊन आली होती. या लक्षणांमध्ये फ्लोटर्स दिसणं, लाइटचे तेजस्वी फ्लॅशेस, डार्क झिग-झॅग पॅटर्न आणि कधीकधी दृष्टी कमी होणं यांचा समावेश होता. जेव्हा त्यांनी तिची तपासणी केली तेव्हा तिला स्मार्टफोन व्हिजन सिंड्रोम (SVS) असल्याचं समोर आलं. यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवतात आणि अंधत्वदेखील येऊ शकतं. अंधारात फोन वापरणं पडलं महागात डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तिची दृष्टी कमी होण्यामागील कारण म्हणजे तिचं अंधारात जास्त फोन वापरणं होतं. जवळपास दीड वर्षापासून तिचं हे रुटीन आणि सवय होती. डॉ. सुधीर यांनी त्यांच्या ट्विटर थ्रेडमध्ये लिहिलं की, मी हिस्ट्री तपासली आणि तिची लक्षणं दिसणं तेव्हापासून सुरू झाली होती, जेव्हा तिने आपल्या मुलाची काळजी घेण्यासाठी नोकरी सोडली. यानंतर, तिला दररोज अनेक तास आपला स्मार्टफोन ब्राउझ करण्याची सवय लागली. यामध्ये दररोज 2 तास अंधारात स्मार्टफोन वापरणे या सवयीचाही समावेश होता. ( वाऱ्याच्या वेगाने हरणाचा पाठलाग, पण पुढच्या क्षणी घडलं असं की वाघ राहिला स्तब्ध ) डॉक्टरांनी मंजूच्या रुटीनची माहिती घेतल्यानंतर डॉक्टरांनी तिला औषधं लिहून दिली आणि स्क्रीनचा वेळ कमी करण्यास सांगितलं. औषधं आणि स्क्रीनच्या कमी वापरानंतर तिची दृष्टी परत येऊ लागली. मंजू 1 महिन्यानंतर बरी झाली. दीड वर्ष दिसण्यास तिचा जो त्रास होता, तो तो बरा झाला आहे. आता तिची दृष्टी सामान्य आहे आणि काही काळापासून तिला रात्री दिसणं बंद झाले होतं, ती समस्याही दूर झाली आहे. (बोलताना-विचार करताना अडथळे येणं सामान्य नाही, असू शकते मेंदूची ही गंभीर समस्या) मंजूवर योग्य वेळी उपचार झाल्याने ती बरी झाली. पण आजच्या काळात या आजाराशी झुंजणारे अनेक जण आहेत. रात्री जास्त वेळ फोन वापरल्याने आंधळेपण येऊ शकतं. त्यामुळे फोन वापरताना काळजी घ्यायला हवी.