जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / बोलताना-विचार करताना अडथळे येणं सामान्य नाही, असू शकते मेंदूची ही गंभीर समस्या

बोलताना-विचार करताना अडथळे येणं सामान्य नाही, असू शकते मेंदूची ही गंभीर समस्या

बोलताना-विचार करताना अडथळे येणं सामान्य नाही, असू शकते मेंदूची ही गंभीर समस्या

मेंदूशी संबंधित सर्वात मोठा धोका म्हणजे स्ट्रोक. जेव्हा मेंदूच्या कोणत्याही भागाला रक्तपुरवठा अचानक खंडित होतो, तेव्हा आवश्यक ऑक्सिजन आणि पोषक घटक पोहोचत नाहीत आणि मेंदूचे नुकसान होते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 9 फेब्रुवारी : आजच्या काळात मेंदूशी संबंधित समस्या वाढत आहेत आणि सर्व वयोगटातील लोक त्याला बळी पडत आहेत. मेंदूशी संबंधित सर्वात मोठा धोका म्हणजे स्ट्रोक. जेव्हा मेंदूच्या कोणत्याही भागाला रक्तपुरवठा अचानक खंडित होतो, तेव्हा आवश्यक ऑक्सिजन आणि पोषक घटक पोहोचत नाहीत आणि मेंदूचे नुकसान होते. ब्रेन स्ट्रोक ही एक अशी वैद्यकीय परिस्थिती आहे, ज्यावर ताबडतोब उपचार न केल्यास शरीराच्या अर्ध्या भागास अर्धांगवायू होऊ शकतो. अनेक वेळा स्ट्रोकने लोकांचा मृत्यू होतो. आज आपण तज्ज्ञांकडून ब्रेन स्ट्रोकची लक्षणे, कारणे आणि प्रतिबंध याबद्दल जाणून घेणार आहोत. झी न्यूज हिंदीने याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. हेल्थ पोर्टल कार्डियाक स्क्रीननुसार, स्ट्रोकच्या सुमारे 43 टक्के रुग्णांना स्ट्रोकच्या एक आठवड्यापूर्वी मिनी स्ट्रोकची लक्षणे जाणवतात. मिनी स्ट्रोक म्हणजे ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक (TIA), जो मेंदूच्या एका भागाला रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे होतो. अचानक अडखळणे हे क्षणिक इस्केमिक अटॅकच्या स्पष्ट लक्षणांपैकी एक आहे.

Gallbladder Stone : पित्ताशयातील खड्यांच्या वेदना सहज होतील कमी, हे पदार्थ खाणे टाळा

अमेरिकन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे आढळले आहे की, क्षणिक इस्केमिक अटॅकच्या सामान्य लक्षणांपैकी एक म्हणजे बोलताना अडखळणे किंवा विचार करताना गोंधळणे. रिसर्च टीमने इस्केमिक स्ट्रोकने पीडित 2416 लोकांची तपासणी केली. यामध्ये संशोधकांना आढळले की, 549 रुग्णांमध्ये क्षणिक इस्केमिक अटॅक वास्तविक इमर्जन्सीपूर्वी दिसले तर बहुतेक प्रकरणांमध्ये एका आठवड्याच्या आत आले.

News18लोकमत
News18लोकमत

ब्रेन स्ट्रोकची इतर लक्षणे - स्ट्रोकदरम्यान अचानक शरीराचा एक भाग काम करणे थांबवतो. - बोलण्यात अडचण येते आणि काही वेळा तोंड वाकडे होते. - डोळ्यांसमोर अंधार पडतो आणि व्यक्तीची दृष्टी धूसर होते. - अचानक चक्कर येणे आणि चक्कर येणे. - काही प्रकरणांमध्ये तीव्र डोकेदुखी आणि उलट्यांचा त्रासदेखील दिसतो. ब्रेन स्ट्रोकपासून बचाव कसा करावा? - धुम्रपान करू नका. - मधुमेह नियंत्रणात ठेवा. - उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवा. - हृदयविकारावर योग्य उपचार करा. - कोलेस्टेरॉलची पातळी वाढू देऊ नका. - दारू पिऊ नका. - स्टिरॉइड्स अजिबात घेऊ नका. - गर्भनिरोधक गोळ्या घेऊ नका. - सकस आहार घ्या आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवा. - वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्या. Food To Increase Platelet Count : हे पदार्थ खाल्ल्यानंतर काही तासांतच वाढतील प्लेटलेट्स; डेंग्यूपासून लगेच होईल सुटका (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात