मुंबई, 10 फेब्रुवारी : सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत नेहमीच व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही प्राणी प्रेमी असे व्हिडीओ आवर्जुन पाहातात. जंगलातील हे व्हिडीओ कधी खूपच मनोरंजक क्षणांचे असतात. तर काही व्हिडीओ हे शिकारीच्या थराराचे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा शिकारीचा व्हिडीओ आहे. यातच असं काहीतरी घडतं ज्याबद्दल आपण विचार देखील केला नसावा. वाघ हा असा प्राणी आहे की त्याच्या तावडीत कोणी अडकला तर तो वाचणं जवळ-जवळ अशक्य आहे. कारण वाघाचा स्पीड आणि त्याची हल्ला करण्याची क्षमता ही खरोखरंच धोकादायक आहे. त्यामुळे वाघाला लांबून जरी पाहिलं तरी धडकी भरु शकते. हे ही पाहा : बिबट्याच्या शिकारीचा व्हिडीओ व्हायरल, पण शिकार मात्र चुकला, स्वत:ची शेवटी पकडली आणि… तुम्ही वाघाला चकमा देताना व्हिडीओ कधी पाहिलाय? या व्हायरल व्हिडीओमध्ये एका हरणाने वाघाला असा काही चकमा दिला की आपल्याला सुद्धा विश्वास बसणार नाही. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक वाघ हरणाच्या मागे लागला आहे. हरणा इतकाच वाघ देखील जोरात पळत आहे. वाघाने जवळ-जवळ अशी हरणाला पकडलंच होतं, इतक्यात हरणाने रस्ता बदलला आणि आपली स्पीड इतकी वाढवली की वाघाला काहीच कळले नाही. अखेर व्हिडीओत पुढे हरिण वाघाच्या हातातून निसटून गेला आणि वाघ फक्त पाहातच उभा राहिला. वाघाला असं बिचाऱ्यासारखं कदाचित पहिल्यांदाच तुम्ही पाहिलं असेल.
Those who feel life comes easy for the top predator, think again.
— Saket Badola (@Saket_Badola) February 6, 2023
Even #Tiger makes several unsuccessful attempts before making a kill.
Nothing comes easy in life and in #nature. Only the fittest survives.
VC: Faiz Aftab
Location: Corbett pic.twitter.com/aqtsRIVx7g
वास्तविक, हा व्हिडिओ IFS अधिकारी साकेत बडोला यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्याचे कॅप्शन असे लिहिले आहे की, ‘ज्यांना वाटते की शिकारीसाठी जीवन सोपे असते तर तसं नाही, कारण वाघाला आता आपलं पोट भरण्यासाठी पुन्हा मेहनत घ्यावी लागणार आहे, शिवाय त्याला संयम देखील बाळगावं लागणार आहे. पण या व्हिडीओवरुन एक गोष्ट तर लक्षात येते की शिकारीत तरबेज असणाऱ्या वाघाचं आयुष्य देखील सोपं नाही. मग आपल्या सारख्या सामान्य माणसांनी लक्ष गाठता न आल्याने हताश होण्याची गरज नाही. हे ही पाहा : Wild Life : मगर पकडणार इतक्यात हरणाने पलटला गेम… शिकारीचा थरार कॅमेरात कैद सोशल मीडियावर देखील हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्स केले आहे, तर अनेकांनी याला लाईक केलं आहे.