JOIN US
मराठी बातम्या / देश / तबलिगी जमातमध्ये सहभागी झालेल्यांचा तपास करायला पोहोचलेल्या पोलिसांवर मशिदीतून दगडफेक

तबलिगी जमातमध्ये सहभागी झालेल्यांचा तपास करायला पोहोचलेल्या पोलिसांवर मशिदीतून दगडफेक

भारतात Coronavirus मुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 10 मृत्यू याच मरकझशी थेट किंवा दुय्यम संपर्कातून संसर्ग झाल्याने ओढवले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 1 एप्रिल : दिल्लीतल्या निजामुद्दीन इथे तबलिगी जमातच्या मरकझमध्ये सामील झालेल्या प्रत्येकाचा शोध सरकार युद्धपातळीवर घेत आहे. महाराष्ट्रातही नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांत या मरकझला जाऊऩ आलेले लोक आहेत आणि त्यांचाही शोध सुरू आहे. दरम्यान बिहारमधून एक धक्कादायक बातमी आली आहे. कोरोनाबाधित संशयितांचा शोध घेण्यासाठी पोहोचलेल्या एका पोलिसांच्या टीमवर बिहारमध्ये मशिदीतून जोरदार दगडफेक करण्यात आली. निजामुद्दीन इथल्या मरकझ या धार्मिक कार्यक्रमासाठी तब्बल 1700 लोक एकत्र जमले होते आणि त्यातल्या 24 जणांना लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतात Coronavirus मुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 10 मृत्यू याच मरकझशी थेट किंवा दुय्यम संबंधातून संसर्ग झाल्याने ओढवले आहेत. अनेक जण इथून संसर्ग घेऊन वेगवेगळ्या राज्यात रवाना झाल्याने युद्धपातळीवर संशयित कोरोनारुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. मंगळवारी याचसंदर्भात माहिती मिळाल्यानंतर बिहार पोलिसांची एक टीम मधुबनी जिल्ह्यातल्या गिदगंज गावात एका मशिदीत चौकशीला गेली असता त्यांच्यावर जोरदार दगडफेक करण्यात आली. संबंधित - निजामुद्दीनच्या मेळाव्यातील 182 जणांची यादी आली समोर, 106 जण आढळले पुणे विभागात या दगडफेकीत अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत पोलिसांनी 15 जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे आणि 4 जणांना अटक केल्याचं समजतं. या मशिदीत मरकझला जाऊन आलेले काही जण असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ते गावात पोहोचले. या मशिदीपाशी गर्दी दिसल्यावर पोलिसांनी लोकांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियामांंनुसार पांगण्याचं आवाहन केलं. पण पोलिसांच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही. पोलिसी खाक्या दाखवत पोलीस आक्रमक होत आहे हे लक्षात येताच मशिदीतल्या जमावाने तुफान दगडफेक सुरू केली. पोलिसांचं एक वाहनावरही हल्ला करण्यात आला. या मशिदीत अनेक जण परदेशातून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती लपवण्यात येत होती. मधुबनीच्या पोलिस अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार या मशिदीत नेपाळमधून आलेले काही जण असण्याची शक्यता आहे. त्यांची माहिती मिळवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. गिदडगंजच्या मशिदीत कोरोनाग्रस्त व्यक्ती असल्याचं अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही. अन्य बातम्या मुंबईत 5000 पेक्षा जास्त ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये, राजेश टोपेंचा खुलासा Fact Check : गरम पाण्याच्या गुळण्या केल्याने कोरोनाव्हायरसचा नाश होतो?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या