मुंबई, 01 एप्रिल : कोरोनाव्हायरसच्या (coronavirus) रुग्णांची संख्या जसजशी वाढते आहे, तसतसं त्याच्यापासून बचावासाठी उपाय सुचवणारे अनेक मेसेजही व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावरून असे अनेक पोस्ट फिरत आहेत. त्यापैकी एक म्हणजे गरम पाण्याच्या (Gargaling with hot water) गुळण्या करणं. गरम पाण्यामध्ये विविध पदार्थ टाकून त्याने गुळण्या केल्यास कोरोनाव्हायरस होत नाही, असा दावा केला जातो आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “कोरोनाव्हायरस फुप्फुसामध्ये पोहोचण्यापूर्वी 4 दिवस घशात राहतो, त्यावेळी त्या व्यक्तीला खोकला लागतो, घशात वेदना होतात. जर त्या व्यक्तीने भरपूर पाणी प्यायलं, तसंच गरम पाण्यात मीठ किंवा व्हिनेगर टाकून गुळण्या केल्या तर व्हायरसचा नाश होतो” मात्र या पोस्टमध्ये किती तथ्य आहे, याचं फॅक्ट चेक न्यूज 18 लोकमतनं केलं. हे वाचा - देवा! घरी जाण्यासाठी एकाने केली मेल्याची अॅक्टिंग, बनवलं खोट डेथ सर्टिफिकेट सोशल मीडिवर पसरणारी ही फेक न्यूज असल्याचं पीआयबीने स्पष्ट केलं आहे. मीठ, व्हिनेगर टाकलेल्या गरम पाण्याने गुळण्या करणं हा कोरोनाव्हायरसवर उपचार नाही, असं पीआयबीने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
तर पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवणं हे संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे, मात्र यामुळे कोरोनाव्हायरसपासून तुमचा बचाव होत नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे.
Q: If drinking water alleviates a sore throat, does this also protect against #2019nCoV infection?
— World Health Organization Philippines (@WHOPhilippines) February 8, 2020
A: While staying hydrated by drinking water is important for overall health, it does not prevent coronavirus infection. pic.twitter.com/AWb1wK89Wj
शिवाय आम्ही काही तज्ज्ञांची मतं जाणून घेतली. इन्युनोलॉजिस्ट डॉ. स्कंद शुक्ल यांनी सांगितलं की, “गरम पाण्यात सैंधव मीठ टाकून किंवा फक्त गरम पाणी प्यायल्याने खोकला, घशात खवखव, वेदना अशा लक्षणांपासून आराम मिळेल. मात्र यााच आर्थ असा नाही की संसर्ग गेला. व्हायरस आपल्या शरीरात सक्रिय राहणार फक्त त्याची लक्षणं दबली जातात. त्यामुळे गुळण्या केल्यानंतर आराम मिळाल्याच्या काही वेळांनी पुन्हा तुमच्यामध्ये लक्षणं दिसली तर तात्काळ डॉक्टरांकडे जा. शिवाय गरम पाण्यात ब्लीच, इथेनॉल असं काहीतरी टाकून त्याने गुळण्या करणं धोकादायक आहे” हे वाचा - ‘10 सेकंद श्वास रोखलात तर तुम्हाला कोरोना नाही’, व्हायरसच्या सेल्फ टेस्टबाबत Fact Check त्यामुळे कोरोनापासून बचाव करायचा असेल, हात स्वच्छ धुणं, खोकताना-शिंकताना तोंडांवर रूमाल धरणं, स्वच्छता राखणं, जास्त कुणाच्या संपर्कात न येणं, घराबाहेर जास्त न पडणं हेच बचावाचे मार्ग आहेत. त्यामुळे त्याचं नीट पालन करा.

)







