मुंबई, 1 एप्रिल : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत कोरोना (Covid - 19) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यादरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. पुढील काही दिवसात मुंबईत कोरोनाग्रस्तांचा (Coronavirus) आकडा वाढण्याची भीती आरोग्यमंत्र्यांनी वर्तवली आहे. सध्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 162 वर पोहोचली असून 5000 पेक्षा अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. संबंधित - कोरोनाच्या लढ्यात डॉ. प्रकाश आमटे सरसावले, योद्ध्यांसाठी मास्कची निर्मिती आज मुंबई महानगरपालिकेच्या वॉर रुमला राजेश टोपे यांनी भेट दिली यावेळी त्यांनी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी बैठकीत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राजेश टोपे म्हणाले, ‘मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या 162 वर पोहोचली आहे. त्यातही 5000 हून अधिक नागरिक हे हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आहेत. यांना क्वारंटाइनमध्ये ठेवून चाचणी केली जाणार आहे. चार हजार लोक या हाय रिस्क व्यक्तींवर लक्ष ठेवून आहेत.’ मुंबई शहरात 5 सरकारी आणि 7 खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाची चाचणी करण्याची सुविधा आहे. येथे दिवसाला 2 हजार चाचण्या होऊ शकतात. सध्या येथे दिवसाला 1200चाचण्या होत आहे. प्रोटोकॉलनुसार चाचणी केली जात असून सध्यातरी अतिरिक्त चाचण्या करण्याची गरज नाही. शिवाय नवे 46 व्हेंटिलेटर मिळाले असून तब्बल 1लाख एन-95 मास्क उपलब्ध असल्याची माहिती टोपेंनी यावेळी दिली. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1600 पार गेला आहे. काल दिल्लीतील प्रकरणानंतर देशातील रुग्णांचा आकडा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी दिल्लीतील निजामुद्दीन परिषदेत सहभागी झालेल्यांनी समोर यावे असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे. संबंधित - गावी पोहोचण्यासाठी 2 तरुण आणि 7 तरुणींनी केला ‘गनिमी कावा’,पोलीसही झाले हैराण
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







