sikkim
नवी दिल्ली : भारतीय जवानांना पुन्हा एकदा कडक सॅल्युट करायला हवा. याचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झाल्यानंतर त्यांनी अगदी कमी वेळात जवळपास 23 पर्यटकांचा जीव वाचवला आहे. या पर्यटकांना रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिक्कीम इथे महामार्गावर हिमस्खलन झाल्याने 70 ते 80 पर्यटक यामध्ये अडकले. नौटाला रोडवर ही घटना मंगळवारी दुपारी 12.30 वाजता घडली. या घटनेची माहिती मिळताच तातडीने जवान आणि आपत्कालीन विभागाचे अधिकारी तिथे पोहोचले.
भारतीय जवान अडकलेल्या नागरीकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर 13 जण गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.
सिक्कीममध्ये झालेल्या भीषण हिमस्खलनामुळे मृत्यू आणि जखमी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. मृतांपैकी तीन जण हे नेपाळचे नागरिक आहेत आणि त्यापैकी दोन उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचे असल्याचं केंद्रीय मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून माहिती दिली.