गर्लफ्रेंडच्या लग्नात तरुणानं दिला 'मौत का तोहफा', नेमका काय प्रकार

प्रेमापासून सुरू झालेली ही कहाणी बदला घेण्यापर्यंत पोहोचली

गर्लफ्रेंडशी लग्न न झाल्याच्या रागातून तरुणाने अशी भेट दिली की पायाखालची जमीन सरकरली

गर्लफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी त्याने होम थिएटरमध्ये दारुगोळा भरला भरून ती भेट दिली

म्युझिक सिस्टीम सुरू होताच जोरदार स्फोट झाला, यामध्ये नवरदेव आणि त्याच्या भावाचा मृत्यू झाला

पोलिसांनी या प्रकरणी संजू मरकाम नावाच्या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत

संजूचं लतिकावर जीवापाड प्रेम होतं, मात्र दोघांमध्ये काहीतरी कारणावरून वाद झाले

लतिकाचं लग्न नातेवाईकांनी हेमेंद्र मेरावी याच्याशी करण्याचा निर्णय घेतला

त्यामुळे तरुण नाराज झाला आणि त्याने याचा बदला घ्यायचं ठरवलं

होम थिएटर खरेदी करून त्यामध्ये दारूगोळा भरून तो भेट दिला आणि हा प्रकार घडला

ही धक्कादायक घटना छत्तीसगडच्या कबीरधाम परिसरात घडल्याची माहिती मिळाली आहे