सिक्किम, 04 एप्रिल : सिक्किममध्ये हिमस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 150 पेक्षा जास्त पर्यटक अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिमस्खलन हे 14 मील जवाहरलाल नेहरू रोड परिसरात झालं आहे. यावेळी मोठ्या सख्यानं पर्यटक उपस्थितीत होते. या दुर्घटनेत घटनास्थळी 70 ते 80 पर्यटक अडकले असल्याची भीती वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी 12.20 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, भारतीय जवान आणि पर्यटन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. बचावकार्य सुरू आहे.
#WATCH | Troops of Trishakti Corps, Indian Army undertake a rescue mission at Gangtok-Natu La road near Milestone 15 in Sikkim where an avalanche struck, claiming seven lives.
— ANI (@ANI) April 4, 2023
Seven others were administered first aid and returned to Gangtok. The road has been opened for traffic… pic.twitter.com/oCseR3HVKW
आतापर्यंत काही पर्यटकांना सुखरूपपणे वाचवलं आहे. यात 30 पर्यटक गंभीर जखमी झाले आहे. या पर्यटकांना एसटीएनएम आणि मणिपाल इथं हलवलं आहे. घटनास्थळी सिक्किम पोलीस, भारतीय सैन्याचे जवान, पर्यटन विभागाचे अधिकारी आणि ड्राइव्हर रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सामील झाले आहे. सिक्किममध्ये हिमस्खलन झाल्यानंतर तातडीने गंगटोकला नाथुलाहून जोडणारा जवाहरलाल नेहरू मार्ग 14 मीलवर बचावकार्य सुरू आहे. (याठिकाणी झाली जगप्रसिद्ध कार्टून “मोगली"ची रचना, निर्माते कोण होते माहितीये का?) आतापर्यंत 22 पर्यटकांना बाहेर काढण्यात आलं आहे. तर रस्त्यावरून बर्फ हटवल्यानंतर 350 पर्यटक आणि 80 वाहनांना वाचवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, पर्यटकांना फक्त 13 मील पर्यंत जाण्यास सांगितलं जातं. पण काही पर्यटक हे 15 मीलकडे गेले होते. त्यामुळे मोठ्या संख्येनं पर्यटक या ठिकाणी अडकले आहे.