JOIN US
मराठी बातम्या / देश / Seema Haider News : अखेर सीमा हैदरचा पर्दाफाश! मंदिरात सचिन सोबत लग्न केलंच नाही? काय आहे सत्य

Seema Haider News : अखेर सीमा हैदरचा पर्दाफाश! मंदिरात सचिन सोबत लग्न केलंच नाही? काय आहे सत्य

सचिन आणि सीमाच्या प्रेमकहाणीबाबत सध्या अनेक बातम्या समोर येत आहेत. मात्र अशातच न्यूज 18 इंडियाने सीमा आणि सचिनच्या नेपाळच्या मंदिरात केलेल्या लग्नाच्या दाव्याबाबत एका मोठा खुलासा केला आहे.

जाहिरात

अखेर सीमा हैदरचा पर्दाफाश! मंदिरात सचिन सोबत लग्न केलंच नाही? काय आहे सत्य

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 21 जुलै : पाकिस्तानातून अवैधपणे भारतात आलेली महिला सीमा हैदर सध्या बरीच चर्चेत आहे. सीमा तिच्या चार मुलांसह भारतात अली असून तिने भारताचा रहिवासी असलेला तिचा प्रियकर तिचा प्रियकर सचिन सोबत लग्न केल्याचा दावा केला आहे. सचिन आणि सीमाच्या प्रेमकहाणीबाबत सध्या अनेक बातम्या समोर येत आहेत. मात्र अशातच न्यूज 18 इंडियाने सीमा आणि सचिनच्या नेपाळच्या मंदिरात केलेल्या लग्नाच्या दाव्याबाबत एका मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानी महिला सीमा आणि तिचा प्रियकर सचिन यांनी एटीएस आणि माध्यमांना दिलेल्या माहितीत त्यांनी भारतात येण्यापूर्वी नेपाळच्या प्राचीन पशुपति नाथ मंदिरमध्ये हिंदू पद्धतीने लग्न केल्याचे सांगितले. तसेच हे दोघे 10 ते 17 मार्च दरम्यान नेपाळमध्ये एकत्र असल्याचे देखील सांगितले होते. परंतु न्यूज 18 ने केलेल्या पडताडणीत त्यांचा हा दावा खोटा असल्याच समोर आलं आहे. न्यूज18 इंडियाची टीम नेपाळच्या प्राचीन पशुपति नाथ मंदिर येथे पोहोचली. तेथे त्यांनी मंदिरातील रजिस्टर चेक केले असता तेथे त्यांना सीमा आणि सचिनच्या लग्नाची कोणतीही नोंद सापडली नाही.

नेपाळच्या प्राचीन पशुपति नाथ मंदिरमध्ये सीमा हैदर आणि सचिन नावाच्या कोणत्याही जोडप्याचे लग्न झालेले नाही. तसेच त्यादोघांनी मंदिराच्या बाहेर लग्न केले असेल तर त्याविषयी माहिती लवकरच मिळेल. भारतातून सीमा आणि सचिनच्या लग्ना संदर्भात चौकशी करण्यासाठी अद्याप एकही पोलीस नेपाळमध्ये आलेला नाही. उत्तर प्रदेश पोलिसांचे विशेष महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी बुधवारी सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. याप्रकरणात सीमा तुरुंगात सुद्धा जाऊन आली आहे.  सीमा संदर्भात पुढील कार्यवाही सुरू असून तिला पाकिस्तानमध्ये पाठवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. घरातील देवाऱ्या शेजारी बसला होता साप, पाहून वृद्ध महिला झाली भयभीत, पुढे जे झालं ते…. प्रशांत कुमार यांनी सांगितले की, सध्या सीमा हैदर प्रकरणाला घेऊन नेपाळला जाण्याचा पोलिसांचा कोणताही विचार नाही.सीमा हैदर संदर्भातील मुद्दा हा दोन देशांशी संबंधित आहे. तेव्हा जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत या विषयावर काहीही बोलणे योग्य ठरणार नाही असे  प्रशांत कुमार यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या