जाहिरात
मराठी बातम्या / देश / घरातील देवाऱ्या शेजारी बसला होता साप, पाहून वृद्ध महिला झाली भयभीत, पुढे जे झालं ते....

घरातील देवाऱ्या शेजारी बसला होता साप, पाहून वृद्ध महिला झाली भयभीत, पुढे जे झालं ते....

घरातील देवाऱ्या शेजारी बसला होता साप, पाहून वृद्ध महिला झाली भयभीत, पुढे जे झालं ते....

घरातील देवाऱ्या शेजारी बसला होता साप, पाहून वृद्ध महिला झाली भयभीत, पुढे जे झालं ते....

पावसाला सुरुवात झाली असून या वातावरणात सापासारखे अनेक सरपटणारे प्राणी त्यांच्या बिळातून बाहेर येतात. तसेच घरे, वाहन, रुग्णालय, कारखाने इत्यादींमध्ये आश्रयासाठी प्रवेश करतात.

  • -MIN READ Local18 Kota,Rajasthan
  • Last Updated :

कोटा, 21 जुलै : देशातील जवळपास प्रत्येक भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यामुळे सर्वत्र पावसाला सुरुवात झाली असून या वातावरणात सापासारखे अनेक सरपटणारे प्राणी त्यांच्या बिळातून बाहेर येतात. तसेच घरे, वाहन, रुग्णालय, कारखाने इत्यादींमध्ये आश्रयासाठी प्रवेश करतात. कोटा राजस्थानमध्ये देखील पावसामुळे अशीच काहीशी घटना घडली येथील एका घरात 5 फूट लांब कोब्रा साप आढळला. कोटातील स्वामी विवेकानंद नगरमध्ये असलेल्या एका घरात 5 फूट लांबीचा काळा कोब्रा साप घुसला. यावेळी घरात एक वृद्ध महिला आणि लहान मुलं होते. वृद्ध महिलेला सापाचा आवाज आला तेव्हा साप घरातील देवाऱ्याच्या दिशेने जात होता. तेव्हा ही महिला घाबरली आणि घरात साप असल्याची माहिती तिने शेजाऱ्यांना दिली. तेव्हा लोकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावले.

News18लोकमत
News18लोकमत

कोल्हापूरकरांनो, काळजी घ्या, पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर, 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी सर्पमित्र गोविंद शर्मा यांना बोलावले. तेव्हा सर्पमित्रांनी अनेक प्रयत्न केल्यानंतर  5 फूट लांब काळ्या कोब्रा सापाला पकडले आणि त्याला जंगलात सोडून दिले. वनविभागाने यावेळी शहरातील नागरिकांना पावसाळ्यात सतर्क राहण्यास सांगितले आणि सापासारखे विषारी प्राणी आढळल्यास त्याला न मारता वनविभागाला कळवण्याची विनंती केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात