JOIN US
मराठी बातम्या / देश / प्रेम की कट? आता समोरासमोर होणार चौकशी! सीमा हैदर संशयाच्या घेऱ्यात

प्रेम की कट? आता समोरासमोर होणार चौकशी! सीमा हैदर संशयाच्या घेऱ्यात

सीमा पाकिस्तानी गुप्तहेर असू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. तिचा भाऊ, काका पाकिस्तानी सैन्यदलात असल्याचं समोर येताच ही शक्यता आणखी बळावली आहे.

जाहिरात

पब्जी, प्रेम, पाकिस्तान! सीमावर आहे पोलिसांची बारीक नजर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नोएडा, 18 जुलै : सचिनच्या प्रेमाखातर भारतात आलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिच्यावर पोलीस बारीक नजर ठेवून आहेत. ती पाकिस्तानी गुप्तहेर असू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. अशातच तिचा भाऊ आणि काका पाकिस्तानी सैन्यदलात असल्याचं समोर आलं आणि ही शक्यता अधिकच बळावली. उत्तर प्रदेश एटीएस पथकाकडून काल तिची सहा तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा एकदा एटीएस अधिकाऱ्यांनी तिला ताब्यात घेतलं. आज सचिन-सीमाची समोरासमोर चौकशी होणार असल्याचं कळतं आहे. आज सकाळी उत्तर प्रदेश एटीएसचं पथक नोएडात सचिनच्या घरी दाखल झालं आणि सीमाला ताब्यात घेतलं. सचिनदेखील एटीएसच्या ताब्यात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी एटीएसने सोमवारी संध्याकाळी सीमाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. मात्र रात्री तिला घरी न पाठवणं योग्य नव्हतं, त्यामुळे तिला घरी सोडण्यात आलं आणि आज सकाळी एटीएसचं पथक पुन्हा त्यांच्या घरी दाखल झालं.

सोमवारी नोएडातील एटीएस कार्यालयात सीमाची सहा तास चौकशी झाली. त्यावेळी तिला तिच्या पासपोर्टबाबत, तिच्या मुलांच्या पासपोर्टबाबत प्रश्न विचारण्यात आले. सीमाची सचिनशी नेमकी ओळख कधी झाली, कशी झाली, प्रत्यक्षात पहिली भेट कुठे झाली, याबाबत चौकशी करण्यात आली. पबजीमध्ये दुसरी मुलं नव्हती का, असंही अधिकाऱ्यांनी तिला विचारलं. सचिन आणि सीमा नेपाळमध्ये 7 दिवस राहिले. तेव्हा ते नेमके कुठे कुठे गेले, कोणाला भेटले, याबाबत सीमाची सखोल चौकशी करण्यात आली. Seema Haider News : …म्हणून मी सचिनला सांगितलं तू पाकिस्तानमध्ये येऊ नकोस; सीमा हैदरच्या दाव्यानं प्रकरणात मोठं ट्विस्ट एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सीमा हैदरच्या पाकिस्तानातील कुटुंबाबाबतही तिला विचारलं, तिच्याकडून कुटुंबीयांविषयी माहिती जाणून घेतली. दरम्यान, भारतात अनेकांनी सीमाला पुन्हा पाकिस्तानात हकलवून लावण्याची मागणी केली आहे. अनेकांनी तिच्यापासून धोक्याची शक्यता वर्तवली आहे. शिवाय पाकिस्तानातून भारतात येण्यासाठी तिच्याकडे कोणताही व्हिजा नव्हता. ती नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आली. त्यामुळे सीमेवरील पोलिसांकडून तिची कोणतीही तपासणी झाली नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या