सीमाला चौकशीत काही इंग्रजी वाक्य वाचण्यास सांगितले होते. ते तिने न अडखळता अगदी व्यवस्थित वाचले.
नवी दिल्ली, 21 जुलै : पाकिस्तानातून अवैधरीत्या भारतात आलेल्या सीमा हैदरबाबत संशय दिवसागणिक बळावतो आहे. उत्तर प्रदेश एटीएसने केलेल्या चौकशीत सीमाने समाधानकारक उत्तरं न दिल्याचं आढळलं आहे. महत्त्वाचं म्हणजे स्वतःला अडाणी म्हणवणारी सीमा चौकशीत चक्क इंग्रजी बोलली. तिची अस्खलित इंग्रजी ऐकून एटीएसचे अधिकारीही चकित झाले. सीमा नेमकी कोण आहे? हा प्रश्न आता गडद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीमाला चौकशीत काही इंग्रजी वाक्य वाचण्यास सांगितले होते. ते तिने अजिबात न अडखळता अगदी सहजपणे वाचले. विशेष म्हणजे आपण अशिक्षित, निरक्षर आहोत, असा दावा सीमाने केला होता. त्यामुळे एक अशिक्षित महिला एवढी सलग आणि अचूक इंग्रजी कशी बोलू वाचू शकते, तिला हे शब्द कसे माहिती? असे प्रश्न एटीएसच्या अधिकाऱ्यांना पडले आहेत. महत्त्वाचं म्हणजे उर्दूचा पगडा असलेल्या भागात राहूनही सीमाचं हिंदी आणि इंग्रजीवर असलेलं प्रभुत्व पाहून ती पाकिस्तानी गुप्तहेर असू शकते हा एटीएसच्या अधिकाऱ्यांचा संशय आता आणखी वाढला आहे.
‘पबजी खेळता खेळता भारतीय तरुणांशी बोलायचे. त्यामुळे हिंदी भाषा कळू लागली’, असा दावा सीमाने केला आहे. मात्र तिच्या या उत्तराने एटीएसचं समाधान झालेलं नाही. उत्तर प्रदेश एटीएसने दोन दिवसांच्या चौकशीनंतर तिला सोडलं असलं तरी हिंदी आणि इंग्रजीवरील तिची पकड, भारतीयांसारखे उच्चार यामुळे संशय कायम आहे. Seema Haider News: हॉटेल रूमवर लग्न… 4 हजार पेमेंट, सीमा हैदर आणि सचिनची रूम नंबर 204 मधील कहाणी महत्त्वाचं म्हणजे ज्याच्या प्रेमाखातर सीमा भारतात आली आहे, तो सचिन स्वत: पश्चिम उत्तर प्रदेशातील बोली भाषेतून संवाद साधतो. मग तुला अस्खलित हिंदी बोलण्याचं प्रशिक्षण दिलं कोणी? असा प्रश्न एटीएसने विचारला असता सीमा गप्प राहिली. तिला यावर काही उत्तर देता आलं नाही. मला कोणीच प्रशिक्षण दिलं नाही. मी केवळ माझ्या प्रेमासाठी सीमा ओलांडून आले आहे, असं ती म्हणाली.