जाहिरात
मराठी बातम्या / देश / Seema Haider News: हॉटेल रूमवर लग्न... 4 हजार पेमेंट, सीमा हैदर आणि सचिनची रूम नंबर 204 मधील कहाणी

Seema Haider News: हॉटेल रूमवर लग्न... 4 हजार पेमेंट, सीमा हैदर आणि सचिनची रूम नंबर 204 मधील कहाणी

सीमा हैदर आणि सचिनची रूम नंबर 204 मधील कहाणी

सीमा हैदर आणि सचिनची रूम नंबर 204 मधील कहाणी

सीमा हैदर सचिन मीनाला पहिल्यांदा नेपाळमध्ये भेटली असून दोघे नेपाळमधील एका हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ Local18 Delhi
  • Last Updated :

पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आलेली महिला सीमा गुलाम हैदरची चौकशी आता यूपी एटीएसकडून संपली आहे. परंतु अद्यापही सीमाला एटीएसकडून क्लीन चिट देण्यात आली नसून याप्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. सीमा हैदर सचिन मीनाला पहिल्यांदा नेपाळमध्ये भेटली असून दोघे नेपाळमधील एका हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती समोर आली आहे. सचिन आणि सीमा हैदर काठमांडू, नेपाळमधील न्यू विनायक हॉटेलमध्ये थांबले होते. या हॉटेलचे मालक गणेश यांनी सांगितले की, दोघेही हॉटेलमधील रूम नंबर  204 मध्ये राहिले होते ज्याचे एका दिवसाचे भाडे 500 रुपये होते. हॉटेल मालक गणेशने सांगितले की, सचिनने फोन करून रूम बुक केला त्यावेळी त्याने सीमाला त्याची पत्नी असल्याचे सांगितले. बुकिंगच्या दिवशी सीमा हैदर आणि सचिन दोघे हॉटेलमध्ये पोहोचले. हॉटेल मालकाने पुढे सांगितले की, सचिन आणि सीमा दोघेही सकाळी होताच बाहेर फिरायला जायचे आणि दोघांपैकी कोणीही त्यांना ते पाकिस्तानी असल्याचे सांगितले नव्हते.

News18लोकमत
News18लोकमत

हॉटेल मालकाने सांगितले की, सचिनने नेपाळच्या करन्सीमध्ये जवळपास 4 हजार रुपयांचे बिल पेमेंट केले होते. तसेच त्याने सांगितले की पहिले सीमा हैदर ही हॉटेलमधून निघाली होती आणि त्याच्या पुढच्या दिवशी सचिनने हॉटेलमधून चेकआऊट केले. सीमा सोबत 4 मुलांना पाहून आम्ही हैराण झालो होतो.  हॉटेलमध्ये सीमा आणि सचिन ज्या रूममध्ये राहात होते तिथेच त्यांनी लग्न देखील केले. असे सांगितले जाते की, दोघे मार्च महिन्यात नेपाळ काठमांडू येथील हॉटेलमध्ये ७ ते ८ दिवस राहिले होते. हॉटेल मालकाने सांगितले की, दोघेही बाहेरून फळे विकत आणून खात होते आणि जेवणात ते फक्त व्हेज खाण पसंत करायचे. सचिनने शिवांश नावाने हॉटेलमध्ये प्रवेश केला होता. यावेळी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांसोबत दोघांचे वागणे चांगले होते. घरातील देवाऱ्या शेजारी बसला होता साप, पाहून वृद्ध महिला झाली भयभीत, पुढे जे झालं ते…. सीमा हैदर अवैधरित्या पाकिस्तानवरून नेपाळच्या मार्गे भारतात दाखल झाली होती. तसेच तिच्याकडे भारतात येण्यासाठी कोणताही विजा नव्हता. सीमा एकटीच नाही तर तिने तिच्यासोबत तिच्या 4 मुलांना देखील अवैद्यरित्या भारतात आणले. ज्यामुळे सीमा हैदर आणि तिच्या मुलांना पाकिस्तानात परत पाठवले जाऊ शकते. परंतु त्याच्या आधी एटीएस तिची सर्वप्रकारे चौकशी करू इच्छितात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18 , Nepal
  • First Published :
जाहिरात
जाहिरात