JOIN US
मराठी बातम्या / देश / खूशखबर! भारत 'या' तारखेपर्यंत मिळवणार कोरोनावर विजय, संशोधकांचा सर्वात मोठा दावा

खूशखबर! भारत 'या' तारखेपर्यंत मिळवणार कोरोनावर विजय, संशोधकांचा सर्वात मोठा दावा

सिंगापूरच्या टेक्नॉलॉजी अँड डिझाइन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी भारत कधीपर्यंत कोरोनामुक्त होऊ शकतो याचा दावा केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 एप्रिल : जगभरात कोरोनाव्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातही कोरोनानं 28 हजारांचा आकडा पार केला आहे. तर, जगभरात हा आकडा 30 लाख लोकांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील सर्वच देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. दुसरीकडे दिवसरात्र वैज्ञानिक कोरोनाला हरवण्यासाठी उपाय योजना शोधत आहेत. या सगळ्यात सिंगापूरच्या टेक्नॉलॉजी अँड डिझाइन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी असा दावा केला आहे की 9 डिसेंबरपर्यंत जगातून कोरोना संपूर्णपणे जाईल. एवढेच नाही तर या संशोधकांनी असाही दावा केला आहे की, भारतात याआधी कोरोनाचा प्रसार थांबेल. यासाठी त्यांनी एक अंदाजही वर्तवला आहे. संशोधकांच्या मते भारत 26 जुलैपर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. एकीकडे कोरोनामुळं घरात कैद असलेल्या लोकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. वाचा- चीनच्या वुहानमध्ये आढळलेला कोरोनाचा ‘तो’ घातक प्रकार भारतात, या 2 राज्यांना केलं सध्या प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे कोरोना विषाणूचा अंत कधी होईल? लॉकडाऊन रद्द केल्यानंतर कोरोना विषाणूची लागण अधिक वेगाने होईल किंवा नाही?  मात्र आता सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड डिझाइनच्या संशोधकांनी लोकांच्या या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. संशोधकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर करून डेटा अ‍ॅनालिसिसद्वारे ही शक्यता वर्तवली आहे. वाचा- ‘या’ जिल्ह्यात एका झटक्यात वाढले 36 कोरोना रुग्ण, नागरिकांची चिंता वाढली अभ्यासानुसार, जगातील सर्व देशांकडून डिसेंबरच्या सुरूवातीस कोरोना पूर्णपणे निघून जाईल.अभ्यासात असेही म्हटले आहे की कोरोना अमेरिकेत 27 ऑगस्ट, स्पेनमध्ये 7 ऑगस्ट, इटलीमध्ये 25 ऑगस्ट आणि भारतात 26 जुलैपर्यंत संपेल. वाचा- 40 दिवस 19 पॉझिटिव्ह टेस्ट! अखेर तरुणानं कोरोनाला हरवून मिळवला डिस्चार्ज चीनचा अंदाज ठरला होता खरा संशोधकांनी कोरोना संपण्याचे तीन अंदाज व्यक्त केले आहेत. यात 97 टक्के, 99 टक्के आणि कधी 100 टक्के शेवट होईल याबाबत माहिती दिली आहे. प्रत्येक देशाचे हवामान आणि तेथील कोरोनाची स्थिती, मृत्यूची संख्या आणि बरे झालेल्या रूग्णांची संख्या यांच्यानुसार संशोधनात असे अनुमान लावले गेले आहेत. या अंदाजानुसार, चीनमध्ये कोरोना संक्रमण निघून जाण्यासाठी 9 एप्रिल ही तारिख सांगितली होती. संशोधनानुसार, कोरोना 30 मेपर्यंत 97 टक्के आणि 17 जूनपर्यंत 99 टक्के आणि 9 डिसेंबरपर्यंत जगभरातून 100 टक्के निघून जाईल. वाचा- ‘चीन कोरोनाला पसरण्यापासून रोखू शकत होता पण…’, ट्रम्प यांनी दिले चौकशीचे आदेश भारतासाठी आशेचा किरण संशोधकांच्या मते भारत कोरोनामुक्त होण्याची सुरुवात 22 मेपासून होईल. यादरम्यान 97 टक्के कोरोना संक्रमण कमी होईल. तर, 1 जून पर्यंत 99 टक्के आणि 26 जुलैपर्यंत 100 टक्के भारत कोरोनामुक्त होईल. संकलन, संपादन-प्रियांका गावडे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या