वॉशिंग्टन, 28 एप्रिल : कोरोनाव्हायरसवरून सध्या जगातील दोन बलाढ्य देश अमेरिका आणि चीन आमने-सामने आले आहेत. दोन्ही देशांमधील भांडणं टोकाला पोहचली आहे. परिस्थिती एवढी बिकट आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला खुलं आव्हान दिलं आहे. ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, चीन कोरोनाला रोखू शकला असता, “आम्ही सध्या या सगळ्याची तपासणी करत आहोत योग्य वेळ आल्यानंतर याबाबत माहिती देण्यात येईल”. मुख्य म्हणजे ज्या वुहानमधून कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली आहे, ते शहर आता कोरोनामुक्त झाले आहे. ट्रम्प यांनी चीनवर हमला करत सांगितले की, आम्ही खुप गंभीर तपासणी करत आहे. आम्ही चीनसोबत खुश नाही आहोत, हे सर्वांना माहित आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे असेही म्हटले की, “आम्ही सध्याच्या परिस्थितीवर खुश नाही आहोत. कारण आम्हाला वाटतं की कोरोनाला थांबवणं शक्य होतं. आज संपूर्ण जग यातना भोगत आहे. किमान 184 देश कोरोनासाठी असुरक्षित आहेत”. विशेष म्हणजे चीनमधून उद्भवणार्या कोरोना विषाणूच्या साथीसंदर्भात दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये बरीच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. वाचा- चाचण्या यशस्वी झाल्या तर 3 आठवड्यांत मिळणार कोरोनावर लस, पुणे SII दावा दरम्यान, हा विषाणू चीनमधील लॅबमधून सोडला गेला आहे की नाही याबद्दल अमेरिकेत शंका निर्माण होत आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी अनेकदा याला ‘चिनी व्हायरस’ म्हटले आहे. चीनमधील वुहानमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे अमेरिकेत सर्वाधिक विनाश झाला आहे. अमेरिकेत 9 लाख 87 हजार 467 लोक संक्रमित झाले आहेत आणि 56 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. वाचा- …तर येत्या 24 तासांत होणार जगाचा अंत? नासाने सांगितलं काय आहे सत्य चीनने जगापासून बरेच काही लपवले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ अलीकडे म्हणाले की, ड्रॅगनला लक्ष्य करताना चीनने जगापासून बरेच काही लपवून ठेवले आहे, प्रत्येकाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. सत्य अजूनही मोठ्या प्रमाणात लपलेले आहे आणि चीनमध्ये अशा लॅब अजूनही सुरू आहेत, ज्यामुळे कोरोना विषाणूची ओळख झाली. अमेरिकेच्या परराष्ट्र परराष्ट्र मंडळाने असा दावा केला की केवळ वुहानच नाही, तर चीनमध्येही अशा अनेक प्रयोगशाळे आहेत जिथे असे प्रयोग केले जात आहेत जे भविष्यात धोकादायक सिद्ध होतील. डिसेंबरपासून चीनचे सत्य समोर येऊ लागले आहे आणि हे स्पष्ट आहे की जागतिक आरोग्य संघटनेने चीनला पाठिंबा दर्शविला आहे. वाचा- घरी जा म्हणणाऱ्या पोलिसावर उगारलं दांडकं, पिंपरीमधला धक्कादायक प्रकाराचा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







