'या' जिल्ह्यात एका झटक्यात वाढले 36 कोरोना रुग्ण, नागरिकांची चिंता वाढली

'या' जिल्ह्यात एका झटक्यात वाढले 36 कोरोना रुग्ण, नागरिकांची चिंता वाढली

पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या 14 महिला 21 पुरुष आणि एका 9 वर्षीय बालकाचा यामध्ये समावेश आहे.

  • Share this:

मालेगाव, 28 एप्रिल : देशात कोरोनाने हाहाकार माजवला असताना सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये आहे. अशात नाशिकमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. मालेगावात गेल्या दोन दिवसात 7 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे नागरिक व प्रशासनात आनंदाचे वातावरण असतांना आज मनपाला मिळालेल्या अहवालात 36 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. हे पाहून सर्वांना पुन्हा धक्का बसला.

पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या 14 महिला 21 पुरुष आणि एका 9 वर्षीय बालकाचा यामध्ये समावेश आहे. आता या शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 164 वर गेली असून आज जे रिपोर्ट आले त्यातून काही रिपोर्ट पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं आहे.

Breaking: देश पुन्हा हादरला! मंदिर परिसरात हत्या 2 साधूंची गळा दाबून हत्या

एकीकडे गेल्या दोन दिवसात 7 रुग्णांनी कोरोनावर मात करून ते घरी परत गेल्यामुळे मालेगावकरांची चिंता काहीशी कमी झाली होती. पण आज 36 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे नागरिक व प्रशासनाच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे. मात्र, असं असलं तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अनेक रुग्ण कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर असून कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी शासन, प्रशासनाला सहकार्य करावं. प्रशासनातर्फे देण्यात येत असलेल्या सूचनांचं पालन करा.

...तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपद वाचवू शकले नसते!

या जीवघेण्या कोरोनावर मात करण्यासाठी आपल्याला घरात बसणं अतिशय महत्त्वाचं आहे. विनाकारण बाहेर पडू नका. घरात रहा सुरक्षित रहा असं आवाहन कृषिमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केलं आहे.

घरी जा म्हणणाऱ्या पोलिसावर उगारलं दांडकं, पिंपरीमधला धक्कादायक प्रकाराचा VIDEO

First published: April 28, 2020, 10:25 AM IST

ताज्या बातम्या