JOIN US
मराठी बातम्या / देश / चित्रकूटमध्ये सापडली 20 फूट रुंदीची रामायणकालीन गुहा! पुरातत्त्व विभाग करणार संशोधन

चित्रकूटमध्ये सापडली 20 फूट रुंदीची रामायणकालीन गुहा! पुरातत्त्व विभाग करणार संशोधन

Ramayan Period Cave Found in Chitrakoot : 14 वर्षांच्या वनवासादरम्यान श्रीरामाचं काही काळ निवासस्थान असलेल्या चित्रकूटमधील गुप्त गोदावरी नदीजवळ 20 फूट रुंदीची एक गूढ गुहा आढळली आहे. ही गुहा आढळल्यानंतर स्थानिकांनी या गुहेची माहिती प्रशासनाला दिली.

जाहिरात

चित्रकूटमध्ये सापडली 20 फूट रुंदीची रामायणकालीन गुहा! पुरातत्त्व विभाग करणार संशोधन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चित्रकूट, 13 मार्च: 14 वर्षांच्या वनवासादरम्यान श्रीरामाचं काही काळ निवासस्थान असलेल्या चित्रकूटमधील गुप्त गोदावरी नदीजवळ 20 फूट रुंदीची एक गूढ गुहा आढळली आहे. ही गुहा आढळल्यानंतर स्थानिकांनी या गुहेची माहिती प्रशासनाला दिली. प्रशासन घटनास्थळी पोहोचून या गुहेची पाहणी करणार आहे. यासोबतच पुरातत्त्व विभागाचं पथकही या गुहेशी संबंधित रहस्याची माहिती गोळा करणार आहे. ही गुहा रामाच्या काळातील असल्याचं म्हटलं जात आहे. चित्रकूट हे मध्य प्रदेशातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे. तेथील महंत दिव्यजीवन दास यांनी सांगितलं की, या गुहेचा शोध लागणं ही कलियुगातील सर्वात मोठी गोष्ट आहे. आपल्या 14 वर्षांच्या वनवासाच्या काळात प्रभू राम चित्रकूटमध्ये साडे अकरा वर्षे राहिले. ही गुहा तेव्हाची असू शकते. चित्रकूटमधील रहिवाशांसाठी ही भाग्याची गोष्ट आहे. चित्रकूटमधील अशा ठिकाणी ही गुहा सापडली आहे, जिथे लाखोंच्या संख्येनं भाविक येतात. ही रामाचीच किमया म्हणावी लागेल. ही गुहा आढळल्यानंतर नागरिकांनी अनेक तर्क-वितर्क लावण्यास सुरुवात केली आहे. कलियुगात ही गुहा सापडणं ही देवाचीच कृपा आहे, असं आमचं मत आहे. तज्ज्ञ करणार पाहणी- या संदर्भात न्यूज18 ने चित्रकूटमधील सतना एसडीएम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गुहा सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, या गुहेचं रहस्य काय आहे हा तपासाचा विषय आहे. या प्रकरणाची माहिती पुरातत्त्व विभागाला देण्यात आली आहे. पुरातत्त्व विभागातील तज्ज्ञ या गुहेतील माहिती संकलित करतील. त्यानंतर या माहितीवर संशोधन करून ही गुहा खरचं रामायण काळातील आहे की नाही, याबाबत निष्कर्ष काढता येईल, असं त्यांनी सांगितलं. **हेही वाचा-** Baby Names: छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून ठेवा तुमच्या बाळाचं नाव पाच वर्षांपूर्वीदेखील सापडली होती गुहा- पाच वर्षांपूर्वी चित्रकूटमधील गुप्त गोदावरीजवळ आणखी एक गुहा सापडली होती. ही गुहा रामायण काळातील असून या गुहेचं जतन केलं जाणार असल्याचं पुरातत्त्व विभागानं तेव्हा सांगितलं होतं. चित्रकूटमध्ये रामायण काळातील अनेक अवशेष सतत पाहायला मिळतात.

चित्रकूटला ‘हिल ऑफ मेनी वंडर्स’ या नावानं ओळखलं जातं. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यांमध्ये पसरलेल्या विंध्य पर्वतरांगेत चित्रकूट वसलेलं आहे. त्यामुळे येथील डोंगराळ भागामध्ये अनेक पुरातन गुहा दडलेल्या असल्याचं पुरातत्त्वशास्त्रज्ञांचं मत आहे. हे ठिकाण पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या आकर्षणाचं केंद्रदेखील आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या