भरतपूर, 05 एप्रिल : भारतात कोरोनाचे सावट वेगाने पसरत आहे. मृतांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच राजस्थानमधील सरकारी रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला. राजस्थानमधील भरतपूर येथील सरकारी रुग्णालयात गर्भवती महिला मुस्लिम असल्य़ामुळे तिला प्रवेश नाकारला. त्यामुळं या महिलेला रुग्णवाहिकेतच मुलाला जन्म द्यावा लागला, मात्र थोड्याच वेळात य़ा नवजात बालकाचा मृत्यू झाला. दरम्यान, भरतपूर रुग्णालयाची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महिलेला सध्या भरतपूरच्या झानाणा रुग्णालयात दाखल केले आहे. झानाणा रुग्णालयाचे प्राचार्य डॉ.रुपेंद्र झा यांनी सांगितले की, या महिलेची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी जयपूरला पाठवण्यात आले आहे. वाचा- कोरोनामुळे अमेरिकेत हाहाकार, डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितली नरेंद्र मोदींकडे मदत महिलेचे पती इरफान खान यांनी सांगितले की, “माझ्या गर्भवती पत्नीला रुग्णवाहिकेत बाळाला जन्म द्यावा लागला, तिला सिक्री येथील रुग्णालयात डॉक्टरांनी मुस्लिम असल्यामुळे जयपूरला जा असे सांगितले”. तर, राजस्थान सरकारमधील मंत्री विश्वेन्द्र सिंग यांनी भरतपूरच्या शासकीय रूग्णालयाच्या ओबीएस आणि गायरो विभागाच्या एचओडीवर लक्ष्य केले. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओही ट्विट केला आहे. वाचा- Coronavirus झाला अधिकच भयंकर, आता मेंदूवरही करतोय हल्ला
वाचा- तीन मुलं असताना सासूवर सुनेनं केले अंत्यसंस्कार, बाळाला काखेत घेऊन दिली मुखाग्नी मोनीत वालिया असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. मंत्री म्हणाले की यातून काहीच लाजिरवाणे होऊ शकत नाही. हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे आणि सरकार अशा बाबींसाठी गंभीर आहे. तसेच, आरोपी डॉक्टरविरोधात कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. विश्वेंद्रसिंग म्हणाले की, तबलीगी जमातने संपूर्ण देशासाठी संकट निर्माण केले, परंतु याचा अर्थ असा नाही की मुस्लिम समाजातील लोकांशी असे वागले पाहिजे. एकीकडे कोरोनाशी दोनहात करण्यासाठी प्रशासन सज्ज असताना, समाजात धर्माच्या नावावर लोकांवर उपचार टाळले जात आहेत. वाचा- उस्मानाबादमध्ये कोरोनाचा तिसरा पॉझिटिव्ह रुग्ण, राज्यातील आकडा 635 वर तबलिगी कार्यक्रमामुळे कोरोनाचा धोका वाढला देशातील कोरोना पॉझटिव्ह रुग्णांमध्ये तब्बल 30 टक्के रुग्ण हे तबलिगीच्या कार्यक्रमात सहभागी किंवा सदस्यांच्या संपर्कात आल्यामुळे वाढले आहेत. याशिवाय गेल्या 24 तासांत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील निजामुद्दीन तबलिगी मकरझ जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या तब्बल 22000 जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. गेल्या 24 तासांत 9000 पासून 22000 नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तबलिगी जमातच्या कार्यक्रमानंतर क्वारंटाइनच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.