उस्मानाबादमध्ये कोरोनाचा तिसरा पॉझिटिव्ह रुग्ण, राज्यातील आकडा 635 वर

उस्मानाबादमध्ये कोरोनाचा तिसरा पॉझिटिव्ह रुग्ण, राज्यातील आकडा 635 वर

एक जण कोरोना पॉझिटिव्ह आहे तर 54 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं काहीसा दिलासा मिळाला आहे.

  • Share this:

उस्मानाबाद, 05 एप्रिल : देशाभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत आहे. आतापर्यंत 3 हजारच्या आसपास कोरोनाग्रस्तांची संख्या झाली आहे. तर सर्वात जास्त रुग्ण भारतात आढळले असून आतापर्यंतचा आकडा 600 च्या जवळपास पोहोचला आहे. महाराष्ट्रात शनिवारी 145 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेला हा रुग्ण उमरगा इथला रहिवासी माहिती मिळत आहे. शनिवारी जिल्ह्यातून 56 स्वॅब नमुने पाठवण्यात आले होते. त्यापैकी 55 जणांचा अहवाल आले आहेत. त्यातील एक जण कोरोना पॉझिटिव्ह आहे तर 54 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र अजून जिल्ह्यातील 44 जणांचे रिपोर्ट येण बाकी आहे. त्यामुळे ते रिपोर्ट काय येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे वाचा-कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सव्वा लाख 'आयुष' डॉक्टरांना प्रशिक्षण देणार

42 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णावर उमरगा इथल्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा रुग्ण आपल्या आईसोबत दिल्लीतील एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेला होता. हा कार्यक्रम कोणता होता याबाबत मात्र प्रशासनाकडून कोणतीही माहिती दिली जात नाही. आतापर्यंत कोरोनाग्रस्त जे रुग्ण सापडले ते उमरगा आणि तळजापूरचे रहिवासी आहेत. याआधीचे 2 रुग्णही उमरगा तालुक्यातील धानोरीचे रहिवासी आहेत. उमरगा तालुक्यात आतापर्यंत तीन जण पॉझिटिव्ह आढळल्यानं आरोग्य विभागानं तातडीनं सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. हे आणखीन कुणाच्या संपर्कात आले होते का याचा तपास सुरू आहे. त्यांनाही क्वारंटाइन करून चाचणी केली जात आहे. दरम्यान कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या 635 वर पोहोचली आहेत. सर्वात जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या मुंबई, पुण्यात आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. शुक्रवारी हा आकडा 490 इतका होता. आज (4 एप्रिल) मृतांचा आकडा 32 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात राज्यात 145 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तब्बल 52 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

हे वाचा-कोरोना: पॅरोलवर तुरुंगाबाहेर आलेल्या गुन्हेगारानं चिरला पोलिसाच्या पत्नीचा गळा

First published: April 5, 2020, 7:18 AM IST

ताज्या बातम्या