तीन मुलं असतानाही सासूच्या पार्थिवाला सुनेनं दिला खांदा, बाळाला काखेत घेऊन केले अंत्यसंस्कार

तीन मुलं असतानाही सासूच्या पार्थिवाला सुनेनं दिला खांदा, बाळाला काखेत घेऊन केले अंत्यसंस्कार

प्रथा परंपरा यांना सद्य परिस्थितीत बाजूला ठेवून सुनेनं सासूच्या पार्थिवाला खांदा देण्यापासून ते मुखाग्नी देण्यापर्यंत सर्व गोष्टी केल्या.

  • Share this:

लखनऊ, 05 एप्रिल : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात लॉकडाउन कऱण्यात आलं आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, देवरिया इथं एक अशी घटना घडली ज्यामुळं सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं. सलेमपुर गावची रहिवाशी असलेल्या सुमित्रा देवी यांचा शुक्रवारी अचानक मृत्यू झाला. तीन मुलं असतानाही त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी कोणीही जवळ नव्हते. तिघेही नोकरीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी होते आणि लॉकडाउन असल्यानं ते अडकून पडले होते.

शेवटच्या क्षणी सुमित्रा देवी यांच्याजवळ त्यांची सून होती. सासूच्या मृत्यूनंतर तिच्यावर अंत्यसंस्कार कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा प्रथा परंपरा यांना सद्य परिस्थितीत बाजूला ठेवून सुनेनं पुढाकार घेत सर्व स्वत:हून केलं. स्थानिक प्रशासनाची मदत घेत तिने सासूच्या पार्थिवाला खांदा दिला आणि पाळण्यात खेळणाऱ्या मुलाला घेऊन तिनं पुढचे विधी पार पाडले.

लॉकडाउनमुळं आईच्या पार्थिवाला खांदा देण्यास तिघा मुलांना येता आलं नाही पण सुनेनं मात्र ही जबाबदारी खंबीरपणे पार पाडली. तिच्या या निर्णयाचं कौतुकही केलं जातं आहे. सुमित्रा देवी यांची तिन्ही मुलं बाहेरगावी असतात. शुक्रवारी सुमित्रा देवी यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर सुनेने त्यांना जवळच्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तिथं डॉक्टरांनी सुमित्रा देवींना मृत घोषित केलं.

हे वाचा : दुबईहून आलेल्या कोरोनाग्रस्त मुलानं घातलं आईचं तेरावं, 1500 जणांवर भीतीचं सावट

सासूचा मृत्यू झाल्याची माहिती सुनेनं पतीसह इतरांना दिली. मात्र लॉकडाउनमुळे कोणीही येणं शक्य नव्हतं. अशा परिस्थितीत सुनेलाच अंत्यसंस्कार करण्यास त्या मुलांनी सांगितलं. अचानक ओढवलेल्या या संकटात दुसरा पर्यायही समोर नव्हता. तेव्हा पाळण्यातल्या मुलाला काखेत घेऊन तिने सासूवर अंत्यसंस्कार केले.

हे वाचा : मृत्यूशी झुंजत पोहोचली रुग्णालयाच्या दारात, ICU ला कुलूप असल्यानं गमावले प्राण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2020 07:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading