मराठी बातम्या /बातम्या /देश /

Coronavirus झाला अधिकच भयंकर, आता मेंदूवरही करतोय हल्ला

Coronavirus झाला अधिकच भयंकर, आता मेंदूवरही करतोय हल्ला

चीनमधील एका अभ्यासानुसार, कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लागण झालेल्या 15 टक्के रुग्णांना कोणती ना कोणती मानसिक समस्या  (mental problem) होती.

चीनमधील एका अभ्यासानुसार, कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लागण झालेल्या 15 टक्के रुग्णांना कोणती ना कोणती मानसिक समस्या (mental problem) होती.

चीनमधील एका अभ्यासानुसार, कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लागण झालेल्या 15 टक्के रुग्णांना कोणती ना कोणती मानसिक समस्या (mental problem) होती.

    नवी दिल्ली, 05 एप्रिल : कोरोनाव्हायरसचा (coronavirus) नाश करण्यासाठी शास्त्रज्ञ जुटले आहेत. या व्हायरसला हळूहळू ओळखून आता कुठे त्याविरोधात लस तयार होत आहे. विविध औषधं वापरून उपचार केले जात आहेत. अशात हा व्हायरसही आपलं रूप बदलू लागला आहे. फुफ्फुसांवर (lung) हल्ला करून जीव घेणारा कोरोनाव्हायरस आता मेंदूवरही (brain) हल्ला करू लागला आहे. हा व्हायरस आता अधिकच भयंकर झाला आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काही कोरोना रुग्णांच्या मेंदूवरही व्हायरसचा गंभीर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांनी याला ब्रेन डिसफंक्शन म्हटलं आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितलं की, व्हायरसचा परिणाम आता रुग्णांच्या बोलण्याच्या क्षमतेवर होतो आहे. या रुग्णांच्या डोक्यावर सूज आल्याने त्यांची डोकेदुखीची समस्या अधिक तीव्र होते आहे. तसंच या रुग्णांची वास आणि चव घेण्याची क्षमताही कमी होते आहे. Corona Effect : 10 क्रिकेटपटू बाशिंग बांधून बसलेत पण व्हायरस जाईना म्हणून थांबले इटलीच्या ब्रेसिका युनिव्हर्सिटीच्या रुग्णालयातील एलेसँड्रो पेडोवानी यांनी सांगितलं, "कोरोना रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बदल दिसत आहेत. फक्त इटलीच नाही तर इतर देशातील डॉक्टरांनाही कोरोना रुग्णांच्या मेंदूत रक्त जमा होणं, मेंदूला सूज येणं, नीट बोलता न येणं, ब्रेन स्ट्रोक अशी लक्षणं दिसून आलीत. काही रुग्ण ताप आणि श्वसन समस्या अशी लक्षणं दिसण्याआधीच बेशुद्ध होतात. इटलीत अशा रुग्णांसाठी वेगळं न्युरो-कोविड युनिट सुरू करण्यात आलं आहे." मुलांना कोरोनाची घालू नका भीती, असं ठेवा व्हायरसपासून सुरक्षित चीनमधील एका अभ्यासानुसार, कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या 15 टक्के रुग्णांना कोणती ना कोणती मानसिक समस्या होती. मेंदूवर हल्ला करणारा हा कोरोनाव्हायरस म्हणजे आता एक आव्हानच आहे आणि जग यासाठी तयार नाही. पिट्सबर्ग युनिव्हर्सिटीचे न्युरोलॉजिस्ट डॉ. शैरी चोऊ म्हणाले, "फुफ्फसाला हानी पोहोचल्यास रुग्णाला वेंटिलेटरची मदत होते, मात्र मेंदूसाठी अद्याप असं कोणतंही तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेलं नाही" कोरोनाव्हायरसच्या या बदलेल्या रुपामुळे आता चिंता अधिकच वाढली आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या