JOIN US
मराठी बातम्या / देश / सावध राहा! कोरोनाला रोखण्यासाठी PM मोदींनी केल्या या 11 सूचना

सावध राहा! कोरोनाला रोखण्यासाठी PM मोदींनी केल्या या 11 सूचना

‘कोरोना विरुद्धची लढाई 14 एप्रिलनंतर संपणार नाही तर खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. त्यासाठी सावध राहा. तयार राहा.’

जाहिरात

**EDS: VIDEO GRAB** New Delhi: Prime Minister Modi interacts with citizens of Varanasi amid nationwide lockdown, in the wake of coronavirus outbreak, via video conferencing, in New Delhi, Wednesday, March 25, 2020. (DD NEWS/PTI Photo)(PTI25-03-2020_000219B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 02 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. सर्व राज्यांचा आढाला घेतला. ही लढाई आपल्यालाला सर्वांना मिळून लढायची आहे. धोरणात सातत्य राखायचे आहे असं पंतप्रधानांनी सगळ्यांना सांगितलं त्याचबरोबर काही सूचनाही केल्या आहेत. ही लढाई 14 एप्रिलनंतर संपणार नाही तर खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे असंही त्यांनी सांगितलं.

  1. लॉकडाऊन संपविल्यानंतर १५ एप्रिलला लगेच लोक रस्त्यावर येऊन गर्दी करणार नाहीत याचे नियोजन प्रत्येक राज्याने करावे. टप्याटप्याने लोक, वसाहती, भाग सुरु होतील हे पाहावे

  2. देशात आत्तापर्यंत आपण कोरोनाला रोखण्यासाठी करीत असलेले प्रयत्न यशस्वी होताहेत असे दिसते पण खऱ्या अर्थाने आत्ता लढाई सुरु झाली आहे .लॉकडाऊन संपले झाले नाही.  आपल्याला सोशल डिस्टेनसिंग किंवा सामाजिक अंतर राखण्याचे पर्यटन ठेवणे महत्वाचे आहे. त्यासाठी मास्क पाहिजे असे नाही तर घरगुती चांगल्या कपड्याचा उपयोग होऊ शकतो. २१ दिवसांची तपस्या वाया जाऊ देऊ नका.

    कोरोनातून बरं झाल्यानंतरही व्हायरस शरीरात राहतो? संशोधनातून माहिती उघड

  3. कोरोनाचा लढा सुरूच राहील पण शांती, सद्भाव, एकता राखणे महत्वाचे आहे. कायदा व सुव्यवस्था टिकून राहील हे पहा. त्यासाठी ड्रोन वगैरे तंत्रज्ञांचा उपयोग करा.

  4. कोरोनाचा मुकाबला हा फक्त डॉक्टर करीत नाहीत. एनसीसी, स्वयंसेवी संस्थांचे तरुण तडफदार युवक यांनाही सहभागी करून घ्या.

  5. निवृत्त अधिकारी, निवृत्त वैद्यकीय अधिकारी, समाजातील काहीतरी योगदान देऊ इच्छिणारे व्यक्ती, तज्ञ, यांचे टास्क फोर्स तयार करा, त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या द्या.

    सांगा कसं जगायचं? लॉकडाऊने सर्व मार्ग बंद केले, FB पोस्ट लिहून तरुणाची आत्महत्या

  6. सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी उगाचच पॅकेजेसची घोषणा करू नका. हा लढा गांभीर्याने घ्यावयाचा आहे. सर्व राज्यांत यादृष्टीने संतुलन हवे. दोन चार दिवस वृत्तपत्रांत प्रसिध्दही मिळेल पण कोरोनाचे संकट वास्तवात खूप मोठे आहे हे लक्षात ठेवा.

  7. आता अनेक ठिकाणी पिकांची कापणी सुरु होईल. पण एकदम सर्व गर्दी होईल ग्रामीण भागात असे काही करू नका. त्याची विभागणी करा. शेतमाल मुख्य बाजारपेठेत आणण्यासाठी काही शेतकऱ्यांनी वाहनं ठरविल्यास खर्चही वाचेल आणि अनावश्यक गर्दी होणार नाही.

    VIDEO : कोण पंत? ऋषभने रोहितला दिलेल्या सिक्सर चॅलेंजवर भडकला हिटमॅन

  8. पीएम गरीब कल्याण बँक खात्यातली रक्कम काढायला गर्दी होते आहे, तशी गर्दी होऊ न देता नियोजन करा.

  9. 11 हजार कोटी केंद्राने राज्याला द्यावयाचा हिस्सा आम्ही लगेच देत आहोत

  10. आयुष्य मंत्रालयाने त्यांच्या संकेतस्थळावर आपली प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी दिलेले उपाय जरूर करा.

  11. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी मोठ्या प्रमाणावर लोक मरण पावतील असे म्हटले आहे. चीनमध्येही कोरोना संसर्गाची प्रकरणे आढळताहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून थंडी सुरु होते त्यामुळे विषाणूचा मुकाबला करण्याचे आव्हान आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या