Home /News /videsh /

कोरोनातून बरं झाल्यानंतरही व्हायरस शरीरात राहतो? संशोधनातून माहिती उघड

कोरोनातून बरं झाल्यानंतरही व्हायरस शरीरात राहतो? संशोधनातून माहिती उघड

आत्तापर्यंत 2 लाखांपर्यंत रूग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर 10 लाख लोकांना लागण झाली आहे. तर जगभरात 47 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

    न्यूयॉर्क 02 एप्रिल : कोरोना व्हायरवर सध्या जगभर संशोधन सुरू आहे. प्रत्येक देश यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यावर औषध सापडलेलं नाही. अमेरिकेत यावर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू असून त्याचे अनेक अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. कोरोनातून रूग्ण बरा होण्याचं प्रमाणही मोठं आहे. आत्तापर्यंत 2 लाखांपर्यंत रूग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर 10 लाख लोकांना लागण झाली आहे. तर जगभरात 47 हजार लोकांचा मृत्यू झालाय. कोरोनातून रूग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या शरीरात व्हायरस असतो की तो जातो असा प्रश्न विचारला जातो. अमेरिकेतल्या काही संशोधनांमध्ये त्यावर निष्कर्ष काढण्यात आले आहेत. रूग्ण बरा झाल्यानंतरही फक्त 14 दिवसच क्लारंटाइन राहणं योग्य नाही. कारण त्यानंतर किमान 7 दिवस हा व्हायरस शरीरात राहू शकतो. त्यामुळे त्यानंतरही काही काळ त्या रूग्णाने सोशल डिस्टन्सिंग पाळल्यास कोरोनाचा धोका कमी होतो असं म्हटलं आहे. या काळात मात्र व्हायरसचा जोर पहिल्यासारखा राहात नाही. तो निष्क्रिय राहतो. कारण त्या काळात त्या माणसाची प्रतिकारशक्ती वाढते असंही म्हटलं आहे. हे वाचा - ...तर येत्या 7 दिवसांत मृतांचा आकडा आणखी वाढणार, WHOने व्यक्त केली भीती अन्य काही संशोधनांमध्येही वेगळे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.  यातच आता तज्ज्ञांनी कोरोना विषाणू हवेत फिरता राहतो, असा खुलासा केला आहे. याचा अर्थ कोरोनाबाधित रुग्ण एखाद्या खोलीत असेल, तर त्या जागेत काही काळ कोरोनाविषाणू हवेत राहतो. डेली मेलच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या नेब्रास्का विद्यापीठाच्या संशोधकांनी हवेमध्ये कोरोनाच्या अस्तित्वाचा अभ्यास केला होता. नेब्रास्का विद्यापीठाच्या अभ्यासानुसार असेही समोर आले आहे की रूग्ण एका ठिकाणाहून गेल्यानंतर कोरोना विषाणू अनेक तास वातावरणात राहू शकतो. संशोधकांचे असेही म्हणणे आहे की, रुग्णाच्या मृत्यूनंतरही कोरोना विषाणू काही प्रमाणात हवेत राहतो. वाचा- क्वारंटाईमधल्या आहाराबाबत WHO कडून महत्त्वाच्या सुचना, ‘हे’ खाणं तुमच्यासाठी चांगलं तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात कोरोनाबाधित रूग्ण राहत असल्यास, त्याला घरी सोडल्यानंतर किंवा त्याच्या मृत्यूनंतर सभोवतालच्या परिसरात मात्र कोरोना जीवंत असो. यापूर्वीही काही अभ्यासांमध्ये असे दिसून आले होते की कोरोना विषाणू केवळ रूग्णाद्वारेच पसरत नाही तर बर्‍याच ठिकाणांच्या पृष्ठभागावर देखील असू शकतो.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या