सांगा कसं जगायचं? लॉकडाऊने सर्व मार्ग बंद केले, फेसबुक पोस्ट लिहून तरुणाची आत्महत्या

सांगा कसं जगायचं? लॉकडाऊने सर्व मार्ग बंद केले, फेसबुक पोस्ट लिहून तरुणाची आत्महत्या

30 मार्च रोजी एल्ड्रिन लिंगडोह या तरुणानं घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

  • Share this:

आग्रा, 02 एप्रिल : देशभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. जवळपास 1 हजार 900 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर अनेकांचे हातावर पोट असणारे व्यवसाय 21 दिवस बंद करावे लागले आणि खाण्याची आभाळ होऊ लागली. आता जगायचं कसं याच विवंचनेतून एका तरुणानं फेसबुक पोस्ट लिहून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मूळचा मेघालयचा असणारा तरुण आग्रा इथे एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होता. लॉकडाऊनमुळे रेस्टॉरंट बंद करावं लागलं. पुढचे अनेक दिवस हातात काम नाही त्यामुळे पैसे मिळणार कसे हा प्रश्न डोळ्यासमोर होता. त्याच निराशेतून या तरुणानं फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 मार्च रोजी एल्ड्रिन लिंगडोह या तरुणानं आपलं आयुष्य संपवलं. आग्रा इथे हा तरुण भाड्यानं घर घेऊन राहात होता. त्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन 24 एप्रिलला लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर रेस्टॉरंटच्या मालकानंही मदत करण्यास नकार दिला होता. त्यामुळे पैसे कमवण्याचा कोणताच मार्ग न उरल्यानं नैराश्येतून आत्महत्या केली आहे.

हे वाचा-लॉकडाऊनमध्येही गर्दी जमवण्याचा होता मौलानांचा प्लॅन? असा पसरला कोरोना

'मी एका अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आलो. अचानक आईचा मृत्यू झाला त्यानंतर मी काहीतरी करावं म्हणून तिथून बाहेर पडून शिलाँगमध्ये आलो. तिथे मी छोट्या-मोठ्या चोरी करून माझा उदरनिर्वाह करत होतो. पण चांगलं आयुष्य जगावं असा विचार मनात आणि मी आग्र्याची वाट धरली. तिथे सिंकदरा कारगील शांती फूड सेस्टॉरंटमध्ये काम करायला सुरुवात केली. लॉकडाऊनच्या सूचनेनंतर हे रेस्टॉरंट बंद झालं. काय करावं हा प्रश्न समोर होता. सर्व गाड्याही बंद होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मार्गच बंद केले आहेत. त्यामुळे कुठे जाण्याचा पर्यायही माझ्याकडे उरला नव्हता. रेस्टॉरंटच्या मालक आणि मालकीणीनेही मला मदत करण्यास नकार दिला. तू हवं तिथे जा असं सांगण्यात आलं. त्यामुळे माझ्याकडे आत्महत्या करण्याचा एकच पर्याय उरला आहे. मी कोणतीही मस्करी करत नाही, कृपया माझ्या मृत्यूनंतर तरी माझं पार्थिक घरी पाठवण्यासाठी मदत करा' आत्महत्या करण्याआधी तरुणानं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.

हे वाचा-कमेंटचा ट्रेंड! पुणे आणि महाराष्ट्र पोलीसांनाही आवरला नाही मोह, पाहा काय म्हणताय

First published: April 2, 2020, 3:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading