ऑपरेशन कावेरी
नवी दिल्ली : ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत संकटग्रस्त सुदानमधून 360 भारतीय लोकांची सुखरुप सुटका करण्यात आली. पहिली तुकडी आज दिल्लीमध्ये पोहोचली. त्यानंतर भारतीयांनी मायदेशात परतल्यानंतर जवान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयघोष केला. सूदानमधून 360 भारतीय नागरिकांना घेऊन जेद्दाहून पहिले विशेष विमान बुधवारी संध्याकाळी दिल्लीला पोहोचले. सुदानचे नियमित सैन्य आणि निमलष्करी दल यांच्यात युद्ध सुरू झालं आहे. या युद्धादरम्यान तिथे अडकलेल्या भारतीयांची सुटका ऑपरेशन कावेरीच्या माध्यमातून केलं जात आहे. केंद्र सरकार हिंसाचारग्रस्त आफ्रिकन देशातून जास्तीत जास्त नागरिकांना वाचवण्याचा सतत प्रयत्न करत आहे. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर लोकांनी ‘भारत माता की जय’, ‘भारतीय सेना झिंदाबाद’ आणि ‘पीएम नरेंद्र मोदी झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या.
लग्नाची जंगी तयारी सुरू असताना केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाचं हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूएएनआयने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय नागरिकांनी मायदेशी परतल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘भारत सरकारने आम्हाला खूप मदत केली. आम्ही इथपर्यंत सुखरूप पोहोचलो ही मोठी गोष्ट आहे. तिथली परिस्थिती अतिशय भयंकर आहे.
Dantewada Naxalite Attack : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात वाहनाच्या चिंधड्या; घटनास्थळाचे पहिले PHOTOएका व्यक्तीने बोलताना सांगितलं, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचे आभार मानतो. खरं तर भारताने ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत जेद्दाहमध्ये एक ट्रान्झिट सुविधा उभारली आहे, जी सुदानमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मोहीम राबवली आहे.