रामसेतू खरंच रामाने बांधला होता का?
रामसेतू खरंच अस्तित्वात होता का? आणि तो श्रीरामानं बांधला होता का प्रश्न कायम चर्चिला जातो.
अक्षय कुमारची प्रमुख भुमिका असलेला रामसेतू चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
तामिळनाडूच्या पंबन बेट आणि श्रीलंकेतील मन्नार बेटादरम्यान ही एक सामुद्रिक रचना आहे.
दक्षिणेत या सेतूला 'रामसेतू' म्हटलं जातं तर श्रीलंकेत 'अडंगा पालम' किंवा 'अॅडम्स ब्रिज' असंही म्हणतात.
रामायणात रामसेतू रामानं बांधल्याचं उल्लेख करण्यात आला आहे.
सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी श्रीरामांना लंकेला जायचं होतं.
त्यावेळी वानरसेनेनं हा दगडी सेतू बांधला अशी आख्यायिका आहे.
अनेक पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते रामसेतू 17 लाख वर्षे जुना असावा.
3 किलोमीटर रुंद आणि 30 मैल लांबीचा हा सेतू नक्की बांधला कसा, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.
काही शास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा प्रवाळ आणि सिलिका दगडांपासून बनलेल्या दगडांपासून बनलेला आहे.
हे हलके दगड पाण्यावर तरंगू लागतात. अशाच दगडांनी नैसर्गिकरित्या हा सेतू निर्माण झालाय, असं त्यांना वाटतं.
अमेरिकेतील एका सायन्स चॅनलने डिसेंबर 2017 मध्ये म्हटलं होतं की, 30 मैल लांबीचा हा सेतू मानवनिर्मित आहे.
पुरातत्व अभ्यासक डॉ.अॅलन लेस्टर यांच्या मते रामसेतू नैसर्गिकरीत्या तयार झालेला नाही.
त्यातील फक्त वाळू नैसर्गिकरित्याच आली आहे. मात्र त्यातील दगड दुसऱ्या ठिकाणाहून आणले आहेत.
वाळू सुमारे 4 हजार वर्षे जुनी तर दगड 7 हजार वर्षे जुने असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
परंतु हे दगड येथे कसे आले आणि ते श्रीरामानं आणले होते का? हे कोडं अजूनतरी उलगडलेलं नाही.