JOIN US
मराठी बातम्या / देश / सर्वात सेफ ट्रेन, तरी इतके जीव कसे गेले? रेल्वे बोर्डाने केला खुलासा

सर्वात सेफ ट्रेन, तरी इतके जीव कसे गेले? रेल्वे बोर्डाने केला खुलासा

कोरोमंडल एक्सप्रेस ही एलएचबी कोचची होती. या ट्रेन फुल्ल स्पीडने असताना जरी अपघात झाला तरी ट्रेनमधील प्रवाशांना जास्त दुखापत होत नाही.

जाहिरात

कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात, समोरून येणाऱ्या मालगाडीला धडक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बालासोर, 04 जून : रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी जया वर्मा सिन्हा यांनी रविवारी बालासोर रेल्वे दुर्घटना प्रकरणी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली. प्राथमिक तपासात सिग्नलमध्ये बिघाड असल्याने हा अपघात झाला अशी माहती त्यांनी दिली. दरम्यान, अपघातावेळी ट्रेनचा वेग १२८ किमी प्रतितास इतका होता त्यामुळे अपघाताची तीव्रता वाढली असंही त्यांनी म्हटलं. सध्या रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांकडून चौकशी केली जात असून त्यांचा अहवाल येण्याची वाट पाहत आहोत असंही जया सिन्हा यांनी सांगितले. कोरोमंडल एक्सप्रेस ही एलएचबी कोचची होती. सर्वात सुरक्षित अशी ही ट्रेन मानली जाते. या ट्रेन फुल्ल स्पीडने असताना जरी अपघात झाला तरी ट्रेनमधील प्रवाशांना जास्त दुखापत होत नाही. मात्र दुर्दैवाने या अपघातात मोठी जिवितहानी झाली. मालगाडीत लोखंड होते आणि त्यामुळे याची तीव्रता वाढली. १२८ च्या स्पीडने कोरोमंडल एक्सप्रेस धडकल्यानंतरही मालगाडीला जास्त नुकसान झालं नाही. याऊलट धडकेत पूर्ण इम्पॅक्ट ट्रेनवर आला. यामुळे कोरोमंडलचे काही डबे डाऊन लाइनवर घसरले. त्याचवेळी यशवंतपूर एक्सप्रेस १२६ च्या स्पीडने जात होती. अवघ्या काही सेकंदासाठी तिचे शेवटचे दोन डबे मागे होते त्याला धक्का लागून दोन्ही डबे घसरले. हे इतक्या वेगात होतं की त्यातील काही लोकांना दुखापत झाली आणि काहींचा जीवही गेला अशी माहिती जया सिन्हा यांनी दिला. Train Accident : बालासोर दुर्घटना कशामुळे घडली? रेल्वेमंत्र्यांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण   अपघात फक्त कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला. ट्रेनचं स्पीड त्यावेळी जवळपास 128 किमी प्रतितास इतकं होतं. तीन ट्रेनची धडक झाली नाही. एकाच रुळावर गाड्या आल्या नव्हत्या. फक्त एकाच ट्रेनचा अपघात झाला. अपघातानंतर ती मालगाडीला धडकली. मालगाडीत लोखंड भरलेलं होतं. त्यामुळे या अपघाताची तीव्रता वाढली. त्याचा परिणाम कोरोमंडल एक्सप्रेसला बसलेला धक्का प्रचंड होता असंही जया सिन्हा म्हणाल्या. एलएचबी कोचमुळे काय होतं? कोरोमंडल एक्सप्रेसला एलएचबी कोच होते. जर्मन बनावटीचे कोच हे वजनाने हलके असतात आणि अशी ट्रेन १६० किमी प्रतितास वेगावने चालवता येते. यामध्ये डिस्क ब्रेक आणि एंटि क्लायमिंग फीचर्स असतात. यामुळे मृत्यू आणि दुखापतीचा धोका कमी असतो. नेहमीच्या इंटिग्रल फॅक्ट्री कोचमध्ये ही फिचर्स नसतात. याशिवाय एलएचबी कोचमध्ये खिडकीचा आकार मोठा असतो. हेसुद्धा एक प्रकारचे सेफ्टी फिचर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या