बालासोर, 04 जून : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी बालासोर ट्रेन अपघातस्थळी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “दुर्घटनेचं प्रमुख कारण समजलं आहे. बुधवारपर्यंत सर्व रेल्वे मार्ग सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.” शुक्रवारी सायंकाळी ओडिशातील बालोसरमध्ये तीन ट्रेनची धडक झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत 288 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजारहून अधिक जण जखमी झाले आहेत. बालासोर रेल्वे दुर्घटना इंटरलॉकिंगमध्ये बदलामुळे झाल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं की, बुधवारी सकाळपर्यंत रेल्वे मार्ग पुर्ववत सुरू करण्याचे ध्येय आहे. या दुर्घटनेचं प्रमुख कारण समजलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल घटनास्थळी पाहणी केली होती. आज रेल्वे ट्रॅक दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आता ट्रॅकचे काम बुधवारी सकाळपर्यंत पूर्ण करायचं आहे. ज्यामुळे पुन्हा रेल्वेसेवा सुरळीत होईल. Odisha Rail Accident: PM मोदी रेल्वे अपघातस्थळी पोहोचताच या 2 अधिकाऱ्यांना केला फोन; काय झाली चर्चा शनिवारी रेल्वे मंत्रालयाने माहिती दिली होती की, ओडिशातील बालासोरमध्ये दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. अधिकारी घटनास्थळी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ओडिशात अपघात झालेल्या ठिकाणी 1 हजारहून अधिक लोक काम करत आहेत. याशिवाय 7 जेसीबी, 2 आपत्कालीन ट्रेन आणि 3 ते 4 रेल्वे आणि रोड क्रेन याठिकाणी आहेत. भारतीय हवाई दलाने मृत आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी Mi 17 हेलिकॉप्टर तैनात केले होते. IAFने प्रशासन आणि रेल्वे यांच्यासोबत बचावकार्यात मोठी भूमिका बजावली. प्राथमिक अहवालानुसार बालासोर जिल्ह्यात बहानागा बाजार स्टेशनवर तीन वेगवेगळ्या रेल्वे रुळांवर बेंगळुरू हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस, कोरोमंडल एक्सप्रेस आणि एक मालगाडी दुर्घटनाग्रस्त झाल्या. यात दोन प्रवासी ट्रेनचे १७ डबे रेल्वे रुळावरून घसरले आणि मोठ्या प्रमाणावर जिवित हानी झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.