ट्रेन अपघात
भुवनेश्वर : रात्री प्रवास करताना अचानक प्रवाशांवर काळानं झडप घातली. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. ओडिसामध्ये ट्रेनचा मोठा अपघात झाला आहे. एक नाही तर तीन ट्रेनची एकमेकांना धडक झाली. या अपघाता २५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 900 जण जखमी झाले आहेत. या अपघाचा भयंकर व्हिडीओ समोर आला आहे. या दुर्घटनेचा ड्रोन व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ अंगावर शहारे आणणारा आहे. हा व्हिडीओमध्ये दिसेल तर गाड्यांचे कोच उस्ताव्यस्थ झाले आहेत. अक्षरश: चुराडा झाला आहे.
Coromandel Train Accident : 5 मिनिटात 2 अपघात, तीन ट्रेन कशा धडकल्या? वाचा काय घडलंआतापर्यंत 288 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक प्रवासी जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. काळजात धस्स करणारा हा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमधून अपघात किती भयंकर असू शकतो याचा अंदाज तुम्ही लावू शकता. बालासोरच्या बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची समोरासमोर टक्कर झाली. अपघातामध्ये एकूण 15 डबे रुळावरून घसरले, तर 7 डबे उलटले. हा अपघात इतका भीषण होता की ट्रेनचे 4 डबे रेल्वे बाऊंड्रीच्याही बाहेर गेले.