नवी दिल्ली, 02 एप्रिल : देशाची राजधानी सध्या कोरोनामुळे हादरली आहे. निजामुद्दीन दर्गा येथे आयोजित कार्यक्रमांमुळे तब्बल 9 हजार लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. मात्र आता याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमात मौलाना साद यांनी लॉकडाउनमध्येही गर्दी जमवण्याचे लोकांना आवाहन केले. मौलानाचा एक ऑडिओ सध्या व्हायरल होत आहे, यामध्ये ते, ‘नमाज सुरू ठेवा आणि मर्काझमध्ये सामील व्हा. ही वेळ अल्लाहची क्षमा मागण्याची आहे’, असे आवाहन लोकांना करत आहेत. मौलांना यांनी लोकांनी मशिदीत येत रहावे, असेही लोकांना सांगितले. दरम्यान न्यूज 18 लोकमत या ऑडीओची खात्री देत नाही. मौलांना साद यांचा हा ऑडीओ व्हायरल झाल्यानंतर ते भूमिगत झाले आहेत. हिंदी दैनिक ‘अमर उजाला’ च्या वृत्तानुसार, मौलाना साद यांच्या व्हायरल ऑडिओचा तपास दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सादर करण्यात आला आहे. त्याचवेळी पोलिसांचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. 23 मार्चच्या या व्हिडीओमध्ये दिल्ली पोलीस निजामुद्दीनमधील धार्मिक घटनेची निंदा करताना दिसत आहेत. वाचा- तब्लिगी जमातमुळे तब्बल 9000 लोकांना कोरोनाचा धोका, केंद्राने जाहीर केली आकडेवारी देशभर कोरोना पसरवण्याचा होता प्लॅन? दुसर्या एका मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला गेला आहे की तब्लिगी जमातमध्ये देश-विदेशातील मौलाना ‘देशविरोधी कृती’ करण्यास भडकवत होते. ‘दैनिक जागरण’ या हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, येथे उपस्थित लोक कोरोना विषाणूचे हत्यार बनवून देशभर नाश घडवण्याचा विचार करीत होते. या कारणास्तव लोक मर्काझमध्ये लपले होते आणि पोलिसांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते हल्लेखोर बनले. अहवालानुसार, देशाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी कोरोना पसरवण्याचा कट रचला जात आहे, अशी भावना तपास यंत्रणांना वाटत असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. वाचा- 24 तासात तब्बल 328 जणांना कोरोनाची लागण, देशात मृतांचा आकडा वाढताच केंद्राच्या आकडेवाडीनुसार 9000 लोकांना धोका निजामुद्दीनमध्ये तब्लिगी परिषदेतने संपूर्ण देशात खळबळ माजली होती. या परिषदेत देशातील विविध राज्यांतली आणि परदेशातली लोकं उपस्थित होती. गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या परिषदेमुळे तब्बल 9 हजार लोकांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे. या परिषदेस किमान 7 हजार 600 भारतीय आणि 1 हजार 300 परदेशी लोक उपस्थित होते असा अंदाज वर्तवला जात आहे. तब्लिगी जमातमधील 7 हजार 688 कार्यकर्त्यांची ओळख केली जात आहे. त्यांच्या संपर्कातील लोकांचाही शोध घेण्यात येत आहे. गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमधील सर्वात जास्त 190, आंध्र प्रदेशातील 71, दिल्लीत 53, तेलंगणामध्ये 28, आसाम 13, महाराष्ट्रातील 12, अंदमानमध्ये 10, जम्मू-काश्मीर 6, गुजरात आणि पुडुचेरीमधील प्रत्येकी एकाचा शोध घेण्यात आला आहे. वाचा- …तर येत्या 7 दिवसांत मृतांचा आकडा आणखी वाढणार, WHOने व्यक्त केली भीती