#BREAKING: 24 तासात तब्बल 328 जणांना कोरोनाची लागण, देशात मृतांचा आकडा वाढताच

#BREAKING: 24 तासात तब्बल 328 जणांना कोरोनाची लागण, देशात मृतांचा आकडा वाढताच

भारतात कोरोनाचा फैलाव जलद गतीने होत आहे. त्यामुळं सध्या निरोगी होणाऱ्या रुग्णांची संख्या ही एकूण रुग्णांपेक्षा कमी आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 एप्रिल : देशभरात कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 1 हजार 965 वर पोहचली आहे. कोरोनामुळं आतापर्यंत 50 लोकांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा गेल्या 24 तासांत सर्वाधिक वाढला आहे. एका दिवसात तब्बल 328 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, आतापर्यंत 151 रुग्ण निरोगी झाले आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंतेची बाब आहे. देशात कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू असला तरी, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तिसऱ्या टप्प्याला कधीही सुरुवात होऊ शकते. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 338 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

मृत्यूदर वाढला

भारतात कोरोनाचा फैलाव जलद गतीने होत आहे. त्यामुळं सध्या निरोगी होणाऱ्या रुग्णांची संख्या ही एकूण रुग्णांपेक्षा कमी आहे. परिणामी भारतातील मृत्यूदर हा झपाट्याने वाढत आहे. भारतात निरोगी होणाऱ्या रुग्णांची संख्या 9% आहे तर, मृतांची संख्या 2.5% आहे. येत्या काळात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी क्लस्टर आउटब्रेकमुळे भारतात रुग्णांची संख्या वाढू शकते.

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू

महाराष्ट्रात 338 जणांना कोरोनाची लागण

महाराष्ट्रातही दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आजही राज्यात 3 नवे रुग्ण आढळून आले आहे. पुण्यात 2 आणि बुलडाण्यात एक रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 338 वर पोहोचली आहे. दरम्यान, कोरोनाबाधित सर्वाधिक रुग्ण हे मुंबई आणि महाराष्ट्रात असल्याची माहिती मिळत आहे. त्यापाठोपाठ केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा राज्यांचा समावेश आहे. तीन राज्यांमध्ये 24 तासांत मोठ्या प्रमाणात नवीन केसेस समोर आल्या आहेत. दिल्लीत 53 नवीन जण पॉझिटिव्ह आढळल्यानं इथली संख्या 152 तर महाराष्ट्रात 36 नव्या केसेस आढळल्यानं 338 वर संख्या पोहोचली आहे.

50 हजारपेक्षाही कमी किमतीत तयार होणार व्हेंटिलेटर, पुण्यातील इंजिनियरची कमाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 2, 2020 10:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading