JOIN US
मराठी बातम्या / देश / गावी जाताना तब्येत बिघडल्यानं सगळे सोडून गेले, मुस्लीम मित्रानं शेवटच्या श्वासापर्यंत दिली साथ

गावी जाताना तब्येत बिघडल्यानं सगळे सोडून गेले, मुस्लीम मित्रानं शेवटच्या श्वासापर्यंत दिली साथ

लॉकडाऊनमध्ये गावी जाताना तब्येत बिघडल्यानं वाटेतच इतर लोकांनी त्याला उतरण्यास सांगितलं. त्यानंतर मुस्लीम दोस्ताने मात्र शेवटच्या श्वासापर्यंत मैत्री निभावली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सूरत, 17 मे : कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या काळात अनेक चांगल्या वाईट घटना घडल्या आहेत. आता मध्य प्रदेशात मैत्रीचं अनोखं उदाहरण बघायला मिळालं. गावी जात असलेल्यांपैकी अमृत नावाचा मजूर मधेच बेशुद्ध पडला. त्या अवस्थेत त्याचा मित्र मोहम्मद कय्यूब त्याला घेऊन रुग्णालयात गेला. तरुणाची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केले पण त्याचा मृत्यू झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रवासी मजूर अमृत हा सूरतवरून त्याच्या गावी जात होता. दरम्यान, अचानक त्याची तब्येत बिघडली. तेव्हा ट्रक चालकाने त्याला वाटेतच उतरलं. याच ट्रकमध्ये अमृतचा मित्र याकूब मोहम्मदसुद्धा होता. अमृतला उतरल्यावर याकूबसुद्धा उतरला. ट्रक निघून गेला पण इकडे अमृतची तब्येत बिघडत होती. बराच वेळ याकूब अमृतसोबत बसून होता. त्यानंतर लोकांच्या मदतीने अमृतला घेऊन याकूब दवाखान्यात पोहोचला पण उपचारावेळीच अमृतने शेवटचा श्वास घेतला. जिल्हा रुग्णालयात अमृतसोबत असलेल्या मोहम्मदने सांगितलं की, दोघेही गुजरातमधील एका फॅक्ट्रीत काम करत होतो. लॉकडाऊमुळे काम बंद झालं म्हणून 4 हजार रुपये भाडं देऊन आम्ही ट्रकने गावी निघालो होते. अचानक अमृतची तब्येत बिघडली तेव्हा ट्रकमधील लोकांनी खाली उतरण्यास सांगितलं. त्याच्यासोबत कोणी नव्हतं त्यामुळे मीसुद्धा उतरलो. हे वाचा : कोरोनातून ठणठणीत होऊन परतली महिला डॉक्टर, शेजाऱ्यांनी तिच्या घराला घातलं कुलूप दरम्यान, अमृतला कोरोना झाला होता का यासाठी त्याचे स्वॅब घेण्यात आले असून त्याचे रिपोर्ट येणं बाकी आहे. अमृत सूरतमधून उत्तरप्रदेशातील बस्ती इथं जात होता. मोहम्मदचीसुद्धा कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. हे वाचा : रेस्टॉरंटने पंतप्रधानांना म्हटलं जागा नाही, टेबल रिकामं होईपर्यंत बघितली वाट

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या