जाहिरात
मराठी बातम्या / देश / कोरोनातून ठणठणीत होऊन परतली महिला डॉक्टर, शेजाऱ्यांनी तिच्या घराला घातलं कुलूप

कोरोनातून ठणठणीत होऊन परतली महिला डॉक्टर, शेजाऱ्यांनी तिच्या घराला घातलं कुलूप

ही योजना ऐच्छिक असून त्यात नाव नोंदविण्याची कुठलीही सक्ती नसणार आहे. ज्यांना इच्छा असेल त्या सगळ्यांना नाव नोंदविता येणार आहे.

ही योजना ऐच्छिक असून त्यात नाव नोंदविण्याची कुठलीही सक्ती नसणार आहे. ज्यांना इच्छा असेल त्या सगळ्यांना नाव नोंदविता येणार आहे.

कोरोनाची लागण झालेली महिला डॉक्टर जेव्हा बरी होऊन परतली तेव्हा ती घरात असताना शेजाऱ्यांनी बाहेरून कुलुप लावलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 मे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात वाढत चालला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेलं लॉकडाऊन आणखी वाढवण्यात येणार आहे. दरम्यान, या संकटात आरोग्य कर्मचारी दिवस रात्र झटत आहेत. रुग्णांची सेवा कऱणाऱ्या डॉक्टरांवर अनेक ठिकाणी पुष्प वर्षाव केला जात असताना एकेठिकाणी मात्र वाईट अनुभव आला आहे. दिल्लीतील एका उच्चभ्रू लोक राहत असलेल्या वसंतकुंज परिसरात कोरोनाची लागण झालेली महिला डॉक्टर ठणठणीत बरी होऊन परतल्यानंतर तिला भेदभावाची वागणूक देण्यात आली. वसंत कुंज इथल्या डॉक्टर महिलेला कोरोना झाला होता. उपचारानंतर घरी परतल्यावर त्यांच्याशी शेजाऱ्यांनी गैरवर्तन केलं. त्यांना घरात डांबून ठेवळं आणि सोसायटी सोडण्याची धमकीही देण्यात आली. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, महिला डॉक्टरने याबाबत तक्रार दिले आहे. त्यात म्हटलं की, सायंकाळी साडेचारच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या मनिष यांनी अचानक आरडाओरड सुरू केली. त्यांनी शिव्याही दिल्या. मनिष यांनी म्हटले की, तुम्हाला कोरोना झालाय आणि इथं राहू शकत नाही. महिला डॉक्टरने मनिषला सांगितलं की, क्वारंटाइन पूर्ण करून आणि रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर घरी राहण्यासाठी आले आहे. एवढं सांगितल्यानंतरही मनिषने आरडाओरडा बंद केला नाही. त्यानंतर मनिषने म्हटलं की, मी बघतोच तू बाहेर कशी निघतेस. आता तुला इथून जावंच लागेल. ज्यांना कॉल करायचा आहे त्यांना कर. हे वाचा : अमेरिकेच्या कंपनीचा दावा - ‘कोरोनावर शोधलं वॅक्सिन, 100 टक्के काम करणार हे औषध’ मनिषने महिला डॉक्टरवर आरडाओरड करत बाहेरून कुलुपही लावलं. महिला डॉक्टरने यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. एकीकडे जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची सेवा करत असताना अशी वागणूक मिळत असल्यानं महिला डॉक्टरनं संताप व्यक्त केला आहे. हे वाचा : 436 किमीचा प्रवास…या फोटोमागची कहाणी वाचून डोळ्यात येईल पाणी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात