Home /News /videsh /

रेस्टॉरंटने चक्क पंतप्रधानांना म्हटलं जागा नाही, टेबल रिकामं होईपर्यंत बघावी लागली वाट

रेस्टॉरंटने चक्क पंतप्रधानांना म्हटलं जागा नाही, टेबल रिकामं होईपर्यंत बघावी लागली वाट

लॉकडाऊमध्ये पतीसोबत जेवण कऱण्यासाठी गेलेल्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांना प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये जागा नसल्यानं अडवण्यात आलं.

    वेलिंग्टन, 16 मे : न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी देशात केलेला नियम त्यांनाच भारी पडला. जेसिंडा ऑर्डन यांना एका रेस्टॉरंटनं प्रवेश देण्यास नकार दिला. त्यांना रेस्टॉरंटच्या बाहेरच उभा रहावं लागलं. शनिवारी सायंकाळी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन वेलिंग्टनमधील प्रसिद्ध कॅफे ऑलिव्हमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी तिथल्या व्यवस्थापकाने त्यांना थांबवलं आणि बसण्यासाठी जागा नसल्याचं सांगितलं. द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार ट्विटरवर एका युजरनं ही माहिती दिली आहे. जॉय नावाच्या युजरने म्हटलं की, OMG, न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी नुकतंच Olive रेस्टॉरंटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना जागा नसल्यानं परत जावं घालवण्यात आलं. खरंतर ही गोष्ट धक्कादायक अशी होती कारण सोशल ड़िस्टन्सिंगच्या नियमानुसार रेस्टॉरंटमध्ये 100 लोकांनाच परवानगी आहे. तसंच 1 मीटर अंतरावर बसण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतरही न्यूझीलंडच्या पंतप्रधानांसाठी रेस्टॉरंटमध्ये बसण्याची व्यवस्था करता आली नाही. या गोंधलासाठी ऑर्डन यांच्या पतीने स्वत:ला जबाबदार धरलं आहे. ते म्हणाले की, आधीच टेबल बूक करता आला नाही त्यामुळे हे सर्व झालं. हे वाचा : डेव्हिड वॉर्नरचा 'बाहुबली' अवतार, पण बाबाच्या व्हिडिओत लेकीनं मारली बाजी देशाच्या पंतप्रधानांसाठी नंतर कॅफेमध्ये व्यवस्था झाल्याचही युजरनं सांगितलं. जेसिंडा ऑर्डन आणि त्यांच्या पतीला रोखणाऱ्या मॅनेंजरने पुन्हा धावत येऊन त्यांना बोलावलं. विशेष म्हणजे जेसिंडा ऑर्डन या इतर ग्राहकांप्रमाणे टेबल रिकामा होण्याची वाट बघत बसल्या होत्या.जेसिंडा इथं आल्याचा अनुभव आठवणीत राहणारा असेल असं रेस्टॉरंटच्या मालकाने सांगितलं. हे वाचा : लेकरांसाठी बाप बनला 'श्रावणबाळ', पोलिसांनी अडवलं आणि केली मदत न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त नाही. तिथं आतापर्यत दीड हजारांवर लोकांना याची लागण झाली असून 21 जणांचा मृत्यू झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून न्यूझीलंडने देशाच्या सीमा 15 मार्चपासून बंद केल्या असून तेव्हापासून लॉकडाऊन कऱण्यात आलं आहे. हे वाचा : लॉकडाऊनमध्ये डिप्रेशनमुळे अभिनेत्याची आत्महत्या, मृत्यूनंतर लोकांनी मदत नाकारली
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या