JOIN US
मराठी बातम्या / देश / काय आहे कांगारू थेरपी, जन्मजात अशक्त बाळासाठी ठरत आहे उपयुक्त जाणून घ्या

काय आहे कांगारू थेरपी, जन्मजात अशक्त बाळासाठी ठरत आहे उपयुक्त जाणून घ्या

आई दिवसातून किमान 16 तास आपल्या मुलाला मिठी मारून एका जागी बसते. या थेरपीचे अत्यंत चांगले परिणाम समोर आले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अनुज गौतम (सागर), 14 मे : लहान बाळांचे अत्यंत नाजूक किंवा वेळेच्या आदीच जन्मलेल्या बालकांना सदृढ करण्यासाठी एक उपाययोजना करण्यात येत आहे. हा पहिल्यांदा प्रयोग मध्य प्रदेशमध्ये करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियन देशांमध्ये आढळणारा कांगारू आपल्या बाळाला पाऊचमध्ये घेऊन फिरतो. त्या धर्तीवर कमी दिवस आणि कमी वजनात जन्मलेल्या नवजात बालकांना थेरपी दिली जात आहे. ज्यामध्ये आई दिवसातून किमान 16 तास आपल्या मुलाला मिठी मारून एका जागी बसते. या थेरपीचे अत्यंत चांगले परिणाम समोर आले आहेत. यामुळेच अशक्त बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. याचबरोबर मुले लवकर बरी होत आहेत आणि लवकरच रुग्णालयातून डिस्चार्जही मिळत आहेत.

एकूणच केएमसी थेरपी हा रामबाण उपाय ठरत आहे, त्यामुळे दिवसेंदिवस या थेरपीचा प्रचार चांगला होत आहे. मध्य प्रदेशमधील सागर जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू वॉर्डचे डॉक्टर प्रिन्स अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार केएमसीमध्ये राहणारी आई आपल्या मुलाच्या त्वचेशी संपर्कात राहते. यामुळे आईची उब मुलांना मिळते, त्याचे अनेक फायदे होतात.

त्या’ एका कारणावरून प्राजक्ता माळीला सर्वांनी केलं ट्रोल, पण आईनचं दिलं शेवटी सर्वांना तोंड

संबंधित बातम्या

पहिला फायदा म्हणजे मुलाचे वजन लवकर वाढते, मुलाची ऑक्सिजनक्षमता वाढते. बाळाला रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज मिळू शकतो. त्यामुळे आईला लवकर दूध मिळणे फायदेशीर ठरते, तसेच जास्त दूध तयार होते आणि आई आपल्या मुलाच्या संगोपणासाठी सशक्त होते. या कांगारू माता असे नाव दिले आहे. ही कांगारू माता आपल्या मुलाला 16 ते 18 तास थेरपी देत असते.

जाहिरात

कांगारू मदर केअर ही संकल्पना कांगारू प्राण्यापासूनच आली आहे, कारण कांगारू आपल्या बाळाला त्यांच्या पाऊचमध्ये ठेवतात यामुळे बाळ पूर्णपणे सुरक्षित राहते. जिल्हा रुग्णालयाच्या सिव्हिल सर्जन डॉ. ज्योती चौहान यांच्या कांगारू मदर केअर कमी वजनाच्या आणि कमी दिवसांच्या बाळांसाठी दिला जातो. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यात आपल्याला विशेष काही खर्च करण्याची गरज नाही.

जाहिरात
आई म्हणून माया तर प्रसंगी बाप बनून दिला आधार! असं आहे शुभांगी गोखले-सखीचं नातं

आपण फक्त शरीराची उष्णता देतो. ते बाळासाठी सर्वात फायदेशीर आहे, यामुळे त्याच्या वाढीमध्ये खूप फरक पडतो, बाळ विकसित होते आणि खूप लवकर सामान्य मुलासारखे बनते. या थेरपीमुळे आई आणि बाळामध्ये अनेक सकारात्मक बदल होतात. स्पर्शामुळे दोघांमधील बंध वाढते असे त्या म्हणाल्या.  

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या