मुंबई, 13 मे- आई म्हणजे सहवास, आई म्हणजे नाव आणि गाव, आई म्हणजे आयुष्याची शिदोरी..आपल्या आईने आपल्यासाठी केलेल्या त्यागाची, कष्टाची, नि:स्वार्थी प्रेमाची आपण आपल्या उभ्या आयुष्यात कधीच परतफेड करु शकणार नाही. मात्र तरीही तिने आपल्याला दिलेल्या ह्या सुंदर आयुष्याबद्दल तिचे आभार मानण्याचा दिवस म्हणजे मातृदिन होय. जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होतो. मराठी मनोरंजन विश्वात देखील अशीच एक माय लेकीची जोडी आहे, जिला पाहून यांच्यात असणारं प्रेम तर अधोरेकित होतचं शिवाय त्यांच्यात असलेली मैत्री या नात्यातची स्वतंत्र्यता आणि पारदर्शकतेचे दर्शन घडवून देते. 6 वर्षांची होती तेव्हा वडिलांचे निधन अभिनेत्री शुभांगी गोखले या प्रख्यात अभिनेते दिवंगत मोहन गोखले यांच्या पत्नी आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील दिलखुलास अभिनेत्री सखी गोखले ही शुभांगी आणि मोहन या दाम्पत्याची मुलगी आहे. मोहन गोखले यांचे वयाच्या अवघ्या 45 व्या वर्षी 1999 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यावेळी सखी ही फक्त 6 वर्षांची होती. यानंतर त्यांनी सखीचा कसा सांभाळ केला व एक आई, सिंगल मदर म्हणून कशाप्रकारे मुलीची जबाबदारी घेतली याबद्दल त्यांनी एक मुलाखतीत सांगितलं होतं. शुभांगी गोखले आणि अभिनेत्री सखी गोखले या माय लेकीची जोडी मराठी मंनोरजन विश्वातील लोकप्रिय आणि तितकीच प्रेमळ जोडी आहे. सखीला तिच्या वडिलांची खूप कमी साथ लाभली आहे. पण आई शुभांगी गोखले यांनी वडिलांची उणीव सखीला कधीच भासू दिलेली नाही. आई असेल किंवा बाबा या दोन्ही भूमिका शुभांगी गोखले या खंबीरपणे पार पाडताना दसतात. शुभांगी गोखले आणि सखीचं नात कसं आहे, असा अनेकांना प्रश्न पडतो. एका मुलाखतीत सखीनं त्यांचं नातं फक्त आई आणि मुलीचं नसून तर त्याही पलीकडचं असल्याचं सांगितलं होतं. सखी नवऱ्यासोबत राहते परदेशात सखी सध्या नवऱ्यासोबत परदेशात राहत असली तरी आईला मिस करताना दिसते. परदेशात ती आईच्या हातचं चिंच गुळाचं वरण खूप मिस करते. शिवाय ती अनेकादा आईसोबतचे फोटो पोस्ट करताना दिसते. आईविषय़ी बोलताना सखी म्हणते की, आई आणि माझं नातं कायम अतिशय मोकळं आणि मैत्रीचं आहे. आम्ही दोघीही एकमेकींना आमच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी शेअर करतो, त्यामुळे आमच्या नात्यात पारदर्शकता आहे. आईने माझ्या आयुष्यात आईच्या भूमिकेबरोबरच बाबाची भूमिका, आजी-आजोबांची भूमिका आणि माझ्या मैत्रीणीची भूमिकाही केली असल्याने ती अनेक पातळ्यांवर लढली आहे.
आई प्रत्येक गोष्टीत कायम पाठिशी सखी आईविषयी बोलताना पुढे म्हणते की, मी अभिनय क्षेत्रात आले तेव्हा माझ्यावर दडपण होतं का असं विचारलं जातं पण दडपण असं नाही म्हणता येणार पण बाबांच्याही आणि आईच्या कामाशी आपण मॅच करावं असं वाटतं आणि ती वेळ आता आली आहे. आणि मला दडपण येत नाही याचं अजून एक कारण म्हणजे आई प्रत्येक गोष्टीत कायम पाठिशी असते. तसंच आमचा कामाचा पिंड खूप वेगळा आहे. तिच्या आणि माझ्या कामाची शैली खूप वेगळी आहे. काम निवडण्याची, विषयांची आमची आवडही बरीच वेगळी आहे. सुरुवातीला काम करताना थोडं दडपण जाणवायचं पण आता मजा येते. मी कायमच प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटक करत होते. शाळा, महाविद्यालयातही मी बऱ्याच स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे. पण पुढे याच क्षेत्रात करिअर करायचं असं मी कधीच ठरवलं नव्हतं. पण अचानक दिल दोस्ती दुनियादारी मालिकेची ऑफर आली.
माणसं कशी ओळखायची, काम कसं निवडायचं हे आईकडून शिकले त्यावेळी टीव्ही या माध्यमात कधी काम केलेले नसल्याने मी फारच संभ्रमावस्थेत होते. पण ऑडीशन दिल्यानंतर करुन बघायला काय हरकत आहे असं वाटल्याने मी काम सुरू केलं. या क्षेत्रात असणारे कष्ट आणि एकूण त्यातील बारकावे माहित असल्याने ही मालिका करायला आईचा पाठिंबा होता मात्र मी या क्षेत्रात स्वत:ला वाहून घ्यावे असे तिला कधीही वाटले नाही. तिच्या अनुभवातून मला काय करायचे नाही हे कळते पण त्याचबरोबर माणसं कशी ओळखायची, काम कसं निवडायचं अशा अनेक गोष्टी मी तिच्याकडून शिकत असते. आईने मला आयुष्यात प्रत्येक गोष्ट करण्यासाठी सक्षम केले आईने मला आयुष्यात प्रत्येक गोष्ट करण्यासाठी सक्षम केले आहे. भारताबाहेर शिक्षण घेण्यासाठी जाणे हा माझ्यासाठी खूप मोठा निर्णय होता, पण आई पाठीशी होती त्यामुळं सगळं शक्य झालं. माझ्या सगळ्याच निर्णयांबाबत आई सल्ला तर देतेच, वेळप्रसंगी दटावून अमूक गोष्ट करु नको असेही सांगते. पण एखादी गोष्ट मी करायची म्हणत असेल तर केवळ जिद्द आहे म्हणून नाही तर त्याच्यामागे माझी असलेली पॅशन तिला समजते आणि ती माझ्यासोबत उभी राहते. आम्ही दोघी सघळं एकमेकींशी शेअर करतो. विशेष म्हणजे सुव्रत आणि तिचं नातंही खूप छान असल्याने ते जावई वगैरे असं नाहीये. त्यामुळे आई माझी आणि सुव्रत अशा दोघांची मैत्रीण असल्याचे देखील तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.