जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / त्या' एका कारणावरून प्राजक्ता माळीला सर्वांनी केलं ट्रोल, पण आईनचं दिलं शेवटी सर्वांना तोंड

त्या' एका कारणावरून प्राजक्ता माळीला सर्वांनी केलं ट्रोल, पण आईनचं दिलं शेवटी सर्वांना तोंड

प्राजक्ता माळीचा आईसोबतचा सुंदर फोटो

प्राजक्ता माळीचा आईसोबतचा सुंदर फोटो

मध्यंतरी एका गोष्टीमुळं प्राजक्ता नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली होती. पण या काळात तिची आई तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली होती.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 मे- प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. मध्यंतरी एका गोष्टीमुळं प्राजक्ता नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली होती. त्याला कारण एकच होतं तिनं ‘रानबाजार’ वेब सिरीजमध्ये साकारलेली भूमिका. या सिरीजमधलं प्राजक्ताचं बोल्ड रूप पाहून तिला खूप ट्रॉल केले गेले. यावरून तिनं कंटाळून तिचं कमेंट बॉक्स देखील बंद केलं होतं. पण प्राजक्ताचं ट्रोलिंग काय थांबलं नव्हतं. तिचं बोल्ड रूप प्रेक्षकं पचवू शकले नाहीत पण या काळात तिची आई तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली होती. प्राजक्ता माळी अनेकदा तिच्या आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. प्राजक्ताची आई प्राजक्ताच्या प्रत्येक क्षणीसोबत असते. मध्यंतरी प्राजक्ता आईसोबत परदेश दौऱ्यावर देखील गेली होती, आईसोबतचे परदेशातील सुंदर फोटो शेअर केले होते. प्राजक्तानं नुकताच दागिन्याचा व्यवसाय सुरू केला आहे. अभिनय असेल किंवा आणि काय तिच्या प्रत्येत गोष्टीच तिला तिच्या आईची मौलाची साथ मिळते, अनेकदा प्राजक्ता तिच्या आईबद्दल सांगताना दिसते. रानबाजार भूमिकेबद्दल देखील तिला ट्रोल करण्यात आलं तेव्हा प्राजक्ताला तिच्या आईची मोठी साथ मिळाली. याबद्दल सांगताना प्राजक्ता म्हणाली होती की, माझी आई माझ्यापेक्षा जास्त बोल्ड आहे. मी तिची परवानगी घेऊनच हे काम केलं आहे. माझी आई पुढारलेल्या विचारांची आहे. त्यामुळे कलाकार प्राजक्ता आणि माणूस म्हणून प्राजक्ता कशी आहे, याची तिला व्यवस्थित माहिती आहे.

जाहिरात

प्राजक्ता पुढे म्हणाली की, कलाकार प्राजक्ताला तिनं कायमच पाठिंबा दिला आहे. इतकंच नाही जेव्हा मी तिला सीरिजचं कथानक आणि त्यातील माझी भूमिका सांगितली. त्यावर ती म्हणाली जर आलिया भट्ट कामाठीपुऱ्यातील गंगुबाई साकारू शकते तर तू का नाही?’ अशा शब्दांत तिनं माझ्या ‘रानबाजार’ मधील भूमिकेला पाठिंबा दिल्याचे प्राजक्ताने सांगितले. प्राजक्तानं सीरीजमध्ये साकारलेली भूमिका ही कामाठीपुऱ्यातील सेक्स वर्करची होती. त्यामुळं प्रेक्षकांनी ट्रेलर पाहून तिला ट्रोल केलं. पण सीरिज पाहिल्यानंतर तिच्या भूमिकेचं कौतुक देखील केलं. अनेकांनी वेगळी भूमिका निवडल्याबद्दल तिचं कौतुक केलं. प्राजक्ताला यंदाचं वर्ष खास गेलं आहे. तिचं काम देखील जोरात सुरू आहे. तसचं तिचा नवीन व्यवसाय देखील चांगली उभारी घेत आहे. सिनेमा, नाटक, मालिका आणि आता प्राजक्तानं तिच्या अभिनयाची झलक वेब सिरीजमध्ये देखील दाखवली आहे. प्राजक्तराज या तिच्या दागिन्याच्या व्यवसायाला सर्वांची पसंती मिळताना दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात