JOIN US
मराठी बातम्या / देश / माकडाच्या मृत्यूनंतर विधीपूर्वक अंत्यसंस्कार, 13व्या दिवशी सुंदरकांड पठण, अन्नदानाचेही आयोजन

माकडाच्या मृत्यूनंतर विधीपूर्वक अंत्यसंस्कार, 13व्या दिवशी सुंदरकांड पठण, अन्नदानाचेही आयोजन

13 दिवसांपूर्वी एका माकडाचा मृत्यू झाला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अयोध्या, 3 एप्रिल : देशातील आध्यात्मिक शहर तसंच मंदिरे आणि मूर्तींची नगरी असलेल्या अयोध्येत माकडांना आजही रामाची वानर सेना म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच प्रभू श्रीरामाच्या सैनिक म्हटल्या जाणाऱ्या एका माकडावर विधी-विधाननुसार राम नगरीमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले आणि 13 दिवसांनी तेराव्याचा विधीही पार पडला.

रामनगरी अयोध्येत एका माकडाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याचे अंतिम संस्कारही विधीनुसार करण्यात आले. इतकेच नाही तर 13 दिवसांनंतर त्याचा 13व्याचा विधीही पार पडला. त्यानिमित्त सुंदरकांड पठण करून अन्नदानही करण्यात आले. प्रयागराज महामार्गावर यापूर्वी एका माकडाचा अपघाती मृत्यू झाला होता. या मृत्यूची माहिती स्थानिकांना मिळताच, स्थानिक लोकांनी वेदविधी आणि सुंदरकांड पठण करून माकडाचे अंतिम संस्कार केले. याला श्रद्धा म्हणा किंवा माणसाचे प्राण्यांवरचे प्रेम, पण माकडाचे तेराव्याचे संस्कार आणि अन्नदानाचा कार्यक्रम हा सध्या राम नगरी अयोध्येमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. यासंदर्भात येथील स्थानिक रहिवासी संतोष कासौधन यांनी सांगितले की, 13 दिवसांपूर्वी एका माकडाचा मृत्यू झाला होता. त्याच्यावर विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यानंतर आता 13 दिवस उलटले असताना सुंदरकांड पठण आणि अन्नदान करण्यात आले. दुसरीकडे, स्थानिक विशाल पांडे यांनी सांगितले की, अयोध्येतील माकडांना हनुमानजी ही संज्ञा दिली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या