JOIN US
मराठी बातम्या / देश / उंची लहान, किर्ती महान! भारतीय सेनेमध्ये रूजू होण्याचं स्वप्न जिद्दीने केलं पूर्ण

उंची लहान, किर्ती महान! भारतीय सेनेमध्ये रूजू होण्याचं स्वप्न जिद्दीने केलं पूर्ण

भारतीय सेना अकादमीची (आयएमए) च्या पासिंग आउट परेड नुकतीच पार पडली. यावेळी अनेक जवान भारतीय सेनेच्या विविध रेजिमेंटचे अधिकारी बनले. मात्र Lt. Lalhmachhuana यांचं सर्वच स्तरातून विशेष कौतुक होत आहे, ते त्यांच्या उंचीमुळे!

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मिझोरम, 18 जून :  देशेसेवेसाठी सैन्यामध्ये भरती होण्याचे स्वप्न अनेकांचे असते. मात्र काही निवडक देशभक्तांची यासाठी निवड होते. ही निवड प्रक्रिया देखील मोठी असते. भारतीय सेना अकादमीची (आयएमए) च्या पासिंग आउट परेड नुकतीच पार पडली. यावेळी अनेक जवान भारतीय सेनेच्या विविध रेजिमेंटचे अधिकारी बनले. यावेळी एका जवानाच्या जिद्दीचं कौतुक झालं. Lt. Lalhmachhuana यांचं सर्वच स्तरातून विशेष कौतुक होत आहे, ते त्यांच्या उंचीमुळे. त्यांची उंची कमी आहे मात्र जिद्द खूप आहे. मिझोरमच्या मुख्यमंत्र्यानी देखील त्यांचे कौतुक करणारे ट्वीट देखील केले आहे. मुख्यमंत्री जोरामथांगा यांनी असे म्हटले आहे की, Lt. Lalhmachhuana यामुळे अनेकांना प्रेरणा मिळते आहे. (हे वाचा- सोन्याचांदीला झळाळी कायम, सलग दुसऱ्या दिवशी किंमती वाढल्या; हे आहेत दर )

मुख्यमंत्र्यांनी ‘उंची लहान, किर्ती महान’ असणाऱ्या या Lt. Lalhmachhuana यांचे काही फोटो शेअर केले आहेत. मुख्यमंत्री जोरामथांगा यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, ‘मिझोरमला आमच्या Lt. Lalhmachhuana यांचा खूप गर्व आहे. जे उत्तर रामहलून याठिकाणी राहणाऱ्या लालसंग्वेला यांचे पूत्र आहेत. Lt. Lalhmachhuana यांना भारतीय सेनेच्या प्रतिष्ठित आर्टिलरी रेजिमेंटमध्ये अधिकारी बनवण्यात आले आहे.’ (हे वाचा- पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची,रोज 100 रुपयांची गुंतवणूक करून कमवा 5 लाख रुपये ) मुख्यमंत्र्यांची पोस्ट अनेकांनी शेअर केली आहे. 14 जून रोजी शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक लाइक्स आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या