सोन्याचांदीला झळाळी कायम, सलग दुसऱ्या दिवशी किंमती वाढल्या; हे आहेत दर

सोन्याचांदीला झळाळी कायम, सलग दुसऱ्या दिवशी किंमती वाढल्या; हे आहेत दर

बुधवारी सोन्याच्या स्पॉट किंमती वाढल्याचे पाहायला मिळाले. या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोन्याचे भाव कमी झाले होते. त्यानंतर 16 जून आणि आज 17 जून रोजी सलग दोन दिवस सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ पाहायला मिळत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जून : बुधवारी देखील सोन्याच्या स्पॉट किंमती वाढल्याचे पाहायला मिळाले. या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोन्याचे भाव कमी झाले होते. त्यानंतर 16 जून आणि आज 17 जून रोजी सलग दोन दिवस सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ पाहायला मिळत आहे.  बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे भाव 56 रुपयांनी वाढले आहेत. परिणामी सोन्याच्या किंमती प्रति तोळा 47596 रुपये इतक्या झाल्या आहेत. त्याचप्रमाणे 23, 22 आणि 18 कॅरेट सोन्यामध्ये देखील काहीशी वाढ झाली आहे. 23 कॅरेट सोन्याचे दर 55  रुपयांनी वाढून किंमती 47405 रुपये प्रति तोळा, 22 कॅरेट सोन्याच्या किंमती 51 रुपयांनी वाढून 43598 रुपये प्रति तोळा तर 18 कॅरेट सोन्याचे दर 42 रुपयांनी वाढून 35697 रुपये प्रति तोळा झाली आहे.  आज सोन्याच्या किंमतीमध्ये झालेली वाढ खूप कमी असली तरी देखील सोन्याच्या किंमती 47 हजारांच्या वरच आहेत.

(हे वाचा-पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची,रोज 100 रुपयांची गुंतवणूक करून कमवा 5 लाख रुपये)

चांदीच्या दरातही आज वाढ झाली आहे. चांदीचे दर प्रति किलो 276 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे चांदी 48146 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. सोन्याचांदीच्या या किंमतीवर जीएसटी नाही लावण्यात आलेला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनची वेबसाइट (ibjarates.com)वर सोन्याचांदीच्या किंमती अपडेट केल्या जातात. त्यानुसार आजचे दर वधारलेले पाहायला मिळाले आहेत.

सोने खरेदी करणार असाल तर लक्षात ठेवा ही बाब

कोरोनामुळे झालेल्या एकंदरित नुकसामुळे ज्वेलर्सनी हॉलमार्किंगची डेडलाइन वाढवण्याची मागणी सरकारकडे केली आहे. गेल्या वर्षी सरकारने अशी घोषणा केली होती की, 15 जानेवारी 2021 पासून देशभरात सोन्याचे दागिने आणि आर्टिफेक्ट्सच्या शुद्धतेसाठी हॉलमार्किंग अनिवार्य असेल. हॉलमार्किंग पद्धती अंमलात आणण्यासाठी आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी सरकारने ज्वेलर्सना एका वर्षाचा कालावधी दिला होता. यानुसार त्यांना फक्त तीन हॉलमार्क असणारे सोनं विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचा समावेश आहे. या नियमाचे पालन न केल्यास ज्वेलर्सना दंड बसू शकतो किंवा तुरुंगाची हवा देखील खावी लागेल.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: June 17, 2020, 3:51 PM IST

ताज्या बातम्या