JOIN US
मराठी बातम्या / देश / UPSCमध्ये किती पेपर असतात माहित नसेल आणि..., ज्योती मौर्यच्या प्रियकराने साधला निशाणा

UPSCमध्ये किती पेपर असतात माहित नसेल आणि..., ज्योती मौर्यच्या प्रियकराने साधला निशाणा

चर्चेत राहण्यासाठी येतंय काही दिवसांत आलोक मौर्य मीडियाला आणखी काहीतरी मसाला देण्याच्या तयारीत आहे’, असा आरोपही मनीष दुबेने केला आहे.

जाहिरात

हाय प्रोफाइल स्वरूप देण्यासाठी आलोक मौर्यने...

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

महोबा, 11 जुलै : देशभरात सध्या ज्योती मौर्य प्रकरण चांगलंच गाजतंय. नवरा बायकोने एकमेकांवर जोरदार आरोप केले आहेत. आता यात ज्योती मौर्यच्या कथित प्रियकरानेही उडी घेतलीये. ‘स्वतःला यूपीएससीमध्ये किती पेपर असतात हेसुद्धा माहिती नसेल आणि दावा करतोय ज्योती मौर्यला शिकवल्याचा’, अशी टीका त्याने आलोक मौर्य यांच्यावर केली आहे. मनीष दुबे म्हणाला, घरातलं प्रकरण घरातच शांत करायला हवं होतं पण याला हाय प्रोफाइल स्वरूप देण्यासाठी आलोक मौर्यने माझं नाव ज्योतीशी जोडून मीडियाला एक चर्चेचा विषय दिला.

ज्योती मौर्य आणि आलोक मौर्य प्रकरण दिवसेंदिवस चांगलंच तापतंय. ज्योती मौर्य या बरेलीच्या एसडीएम असून त्यांचं होमगार्ड कमांडंट मनीष दुबे यांच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप त्यांचे पती आलोक मौर्य यांनी केला आहे. मी शिकवलं आणि आता शिकून अधिकारी झाल्यावर ज्योतीला मला सोडून मनीषसोबत लग्न करायचंय, असा दावा त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी शेअर केलेले दोघांचे कथित व्हॉट्सऍप चॅट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. रात्रीच्या अंधारात का चमकू लागतात प्राण्यांचे डोळे? रंजक आहे यामागचं कारण आता यावर मनीष दुबेने प्रतिक्रिया दिल्याने प्रकरण आणखी तापणार असं दिसत आहे. दरम्यान, ‘चर्चेत राहण्यासाठी येतंय काही दिवसांत आलोक मौर्य मीडियाला आणखी काहीतरी मसाला देण्याच्या तयारीत आहे’, असा आरोपही मनीष दुबेने केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या